Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 20, 2022, 12:50 PM

Smartphone blast: गेल्याकाही दिवसात सातत्याने फोनचा स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करू शकता.

 

smartphone blast

हायलाइट्स:

  • मध्य प्रदेशात घडली फोनचा स्फोट झाल्याची घटना.
  • फोन स्फोट होऊ नये म्हणून फॉलो करा या टिप्स.
  • बनावट चार्जर, बॅटरीचा वापर टाळा.
नवी दिल्ली : लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण दिवसभर फोनचा वापर करत असतो. मात्र, फोन वापरताना सावधगिरी बाळगणे देखील गरजेचे आहे. गेल्याकाही दिवसात स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतेच मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे फोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एका मोबाइल रिपेयरिंगच्या दुकानात फोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे फोनचा सुरक्षित वापर करणे गरजेचे आहे. फोनचा स्फोट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.

वाचाः कधी लाँच होणार जिओ ५जी? किती असेल प्लान्सची किंमत? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

फोन वापरताना या चुका टाळा

  • फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याचे प्रमुख कारण जास्त वेळ चार्ज करणे हे आहे. तुम्ही जर फोनला तासंतास चार्ज करत असाल तर तसे करू नका. फोन फुल चार्ज होताच, चार्जर रिमूव्ह करा.
  • अनेकजण मोबाइलची बॅटरी खराब झाल्यानंतर दुकानातून बदलून घेतात. पण पैसे वाचवण्यासाठी बनावट बॅटरी खरेदी करतात. अशा बॅटरी लवकर खराब होतात व स्फोट होण्याचा धोका असतो.
  • सध्या स्मार्टफोनसोबत फास्ट चार्जर दिले जातात. मात्र, अन्यजण फोनसोबत येणारा चार्जर न वापरता इतर चार्जरचा वापर करत असतात. त्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊन स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.

वाचाः कधी लाँच होणार जिओ ५जी? किती असेल प्लान्सची किंमत? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

अशी घ्या फोनची काळजी

  • फोनला एकदा फुल चार्ज केल्यावर वारंवार चार्जिंगसाठी लावू नये. तसेच, ओव्हर चार्ज देखील करू नये.
  • बॅटरी खराब झाल्यास कंपनीच्या स्टोरमधून ओरिजिनल बॅटरी खरेदी करा.
  • नेहमी कंपनीच्या चार्जरचाच वापर करा.
  • तसेच, मोबाइलवर जास्तवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या

वाचाः तुमचा फोन ५जी सपोर्ट करतो की नाही? या सोप्या प्रोसेसने घ्या जाणून

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here