फेस्टिव्हल सीझन लवकरच येणार आहे. ऑगस्ट पासून याची सुरुवातही झाली आहे. रक्षा बंधन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त काही कंपन्यांनी सेल आयोजित केले होते. Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर नेहमीच वेगवेगळे सेल आयोजित केले जातात. फ्लिपकार्टवर Big Saving days आणि अमेझॉनवर great freedom festival ची सुरुवात झाली आहे. आगामी महिन्यात अनेक प्रकारचे सेल येतील. या सेलमध्ये शॉपिंग करताना खूप सारे ऑफर, डिस्काउंट, कूपन, कॅशबॅक तसेच फ्री गिफ्ट दिले जातात. अनेक जण सेलमध्ये नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याची योजना बनवत असतात. परंतु, खरेदी केल्यानंतर त्यांना समजते की, वस्तू महाग लागली आहे. तुम्हाला जर सेलमधून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घ्या सोप्या ५ टिप्स.

सर्वात आधी ऑफरला समजून घ्या

शापिंग साइटच्या होम पेजला ओपन करताच समोर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट किंवा १५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिसते. हे सर्व वाचून अनेक जण खूष होतात. त्यात घाईघाईत वस्तू खरेदी करतात. परंतु, या ठिकाणी ‘UP To’ वर ध्यान न दिल्याने मोठे नुकसान होते. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर या प्रकारच्या शॉपिंग दरम्यान कोणत्याही प्रोडक्ट कार्ट मध्ये टाकण्याआधी त्यावर मिळत असलेल्या ऑफरला आधी समजून घ्या. वेगवेगळ्या बँक कार्ड, वॉलेट व यूपीआय पेमेंटवर वेगवेगळे बेनिफिट मिळते. त्यामुळे सर्वात आधी नीट ऑफर्स समजून घ्या. नंतरच खरेदी करा.

वाचाः Noise चे शानदार इयरफोन्स भारतात लाँच, अवघ्या १० मिनिटांच्या चार्जमध्ये २० तास ऐकू शकता गाणी

​टर्म एन्ड कंडिशन्सला समजून घ्या

मोठा डिस्काउंट किंवा मोठी कॅशबॅक पाहून अनेक जणांना भुरळ पडते. व ते लगेच शॉपिंग करतात. परंतु, बेनिफिटसाठी ‘Terms & Conditions’ समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होवू शकते. उदाहरणासाठी, अमेझॉन यूपीआय पेमेंट करताना जर २० टक्के कॅशबॅक मिळत असेल तर याची कंडिशन ही सुद्धा असते की, यूपीआय आयडी मॅन्यूअली सबमिट करायची नसते. याच प्रमाणे एक्सचेंज ऑफर मध्ये कोणताही जुना फोन ८ हजार रुपये किंमतीत मिळत असेल तर त्याची कंडिशन बॉडीवर डेंट नसायला हवे. जर असेल तर ८ हजार रुपये मिळणार नाहीत. याच प्रमाणे टर्म एन्ड कंडिशन ऑनलाइन शॉपिंग मध्ये जारी करण्यात आलेल्या शॉपिंगआधी बारकाईने वाचणे नेहमीच फायदेशीर असते.

वाचाः आता प्रत्येक UPI पेमेंटवर द्यावे लागणार पैसे, RBI चा नवीन प्रस्ताव काय आहे?, जाणून घ्या

सूट आणि डिस्काउंटची संपूर्ण डिटेल्स

ऑनलाइन सेलमध्ये सर्वात जास्त आकर्षित करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे डिस्काउंट होय. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट, या शॉपिंग साइट्सवर कोणत्याही प्रोडक्टचे जुने मूल्य दाखवले जाते. किंवा त्या प्रोडक्टवर मिळत असलेली सूट किंवा डिस्काउंट नंतरची किंमत दाखवली जाते. जर समजा एकाध्या वस्तूची किंमत २० हजार रुपये सांगितली असेल तर त्यावर ५ हजार रुपयाच्या सूट नंतर सेल किंमत १५ हजार रुपये सांगितली जाते. परंतु, या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ती वस्तू खरंच २० हजार रुपयाची आहे का, त्यामुळे ५ हजार रुपयाच्या सूट कडे लक्ष देण्याआधी त्या वस्तूची खरी किंमत किती आहे, हे तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे नेहमी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

वाचाः Jio 5G in India : 5G सर्विस, Jio 5G फोन, 5G SIM आणि किंमतीसह सर्वकाही जाणून घ्या

​सेलरला ओळखणे गरजेचे

जर तुम्ही अॅपल किंवा सॅमसंगचा कोणताही स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर त्या फोनवर मिळत असलेली ऑफर आणि डिस्काउंट पाहू शकता. परंतु, तो फोन कोण विकतोय, हे ही पाहणे गरजेचे आहे. ऑनलाइन शॉपिंग सेल मध्ये असे अॅपलचा फोन अॅपल कंपनीचे विकेल किंवा सॅमसंगचा फोन सॅमसंग कंपनीचे विकेल. अनेकदा अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या शॉपिंग साइट्सवर थेट कंपनी आपले सामान विकते. परंतु, प्रोडक्टला विकणारे सेलर विगळे असतात. फक्त मोबाइल फोन नव्हे तर अन्य सामान खरेदी करण्याआधी सर्वात आधी पाहा की, सेलर कोण आहे. त्या सेलरचे काही रिव्ह्यू व फीडबॅक जरूर वाचा.

वाचाः ३२ इंच Smart TV ८ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

पेमेंट करताना काळजी घ्या

सामान ५०० रुपयाचे असो की, ५० हजाराचे. ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. तुमच्याकडून करण्यात येत असलेली पेमेंट पूर्णपणे सिक्योर आहे का, हे तपासा. बँक कार्ड्स, यूपीआय आयडी आणि वॉलेट इत्यादी पूर्णपणे सुरक्षित ठेवा. आपली खासगी माहिती कोणासोबतही शेअर करू नका. जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी अंतर्गत सामान खरेदी केले असेल तर डिलिव्हरी बॉयला सुद्धा पेमेंट करताना आपली बँक डिटेल्स देवू नका. जर तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट केली असेल तर घाईघाईत त्याला अॅक्सेप्ट करू नका. अमाउंटला पुन्हा एकदा चेक करा.

वाचाः OPPO ते iPhone… या ५ स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी, सुरुवाती किंमत फक्त ६,५९९ रुपये

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here