देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्रीपेड प्लान्स सादर करत आहे. कंपनीकडे १५ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. याशिवाय, दररोज १ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स देखील कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत. जिओ प्रत्येक ग्राहकांच्या गरजेनुसार प्लान्स ऑफर करते. कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज प्लान्समध्ये केवळ डेटा, वॉइस कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर अनेक बेनिफिट्स दिले जातात. कंपनीच्या प्लान्समध्ये तुम्हाला Jio Apps सह ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे देखील सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही जर Jio चे ग्राहक असाल व दररोज २ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स शोधत असाल तर कंपनीकडे अशा प्लान्सची एक मोठी लिस्ट उपलब्ध आहे. दररोज २ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या अशाच प्रीपेड प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio चा २४९ रुपयांचा प्लान

jio-

देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे २४९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २३ दिवस आहे. जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ४६ जीबी डेटा दिला जातो. डेली डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, देशभरात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचाः ‘या’ चुका करत असाल तर तुमच्या फोनचा होऊ शकतो स्फोट, पाहा डिटेल्स

​Jio चा २९९ रुपयांचा प्लान

jio-

Jio च्या या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Jio चा ५३३ रुपयांचा प्लान

Jio च्या या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यामध्ये देखील तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, दररोज १०० मोफत एसएमएस, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.

​Jio चा ७१९ रुपयांचा प्लान

jio-

Jio कडे ७१९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे संपूर्ण कालावधीसाठी १६८ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये महिन्याचा खर्च जवळपास फक्त २४० रुपये आहे. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. यात JioTV, JioCinema, JioSecurity चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचाः Realme Narzo 50 स्मार्टफोनला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी, फीचर्स-ऑफर एकदा पाहाच

​Jio चा ७९९ रुपयांचा प्लान

jio-

Jio च्या ७९९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity सारख्या जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो. या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील तुम्हाला मिळेल.

​Jio चा १,०६६ रुपयांचा प्लान

jio-

या प्लानची वैधता ८४ दिवस असून, यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस, जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस आणि १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Jio चा २,८७९ रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioSecurity सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचाः Motorola ला टक्कर द्यायला येतोय Samsung चा तब्बल २००MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन, फिंगरप्रिंट सेंसरही असेल जबरदस्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here