5G Price In India : देशात सध्या 5G ट्रेंडिंग आहे. 5G नेटवर्क कधी येईल ? किती आणि कसा स्पीड मिळेल. याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहेत. अशात अनेक मोठ्या कंपन्या देखील यात समोर आल्या आहे. तुम्हीही 5G नेटवर्कवर स्विच करणार असाल तर आधी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओने भारतात 5G नेटवर्कच्या रोलआउटची तयारी केली आहे आणि दूरसंचार कंपन्यांनी याबद्दल आधीच काही मोठे दावे केले आहेत. काही कंपन्या १५ ऑगस्ट रोजी 5G लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, तसे झाले नाही. अशात देशात 5G कधी येईल आणि आणि त्याचे फायदे कधी अनुभवायला मिळतील याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचे आहे. तुम्हालाही याबाबत सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच.पाहा डिटेल्स.

Airtel 5G

airtel-5g

Airtel 5G ची किंमत काय असेल ? Airtel 5G च्या किंमती 4G प्रीपेड प्लान्स सारख्याच असण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे CTO रणदीप सेखॉन यांनी सांगितले आहे की, 5G आणि 4G टॅरिफमध्ये कोणताही मोठा फरक नाही. भारतात 5G प्लॅन आणि 4G टॅरिफची किंमत सारखीच असण्याची आम्हाला अपेक्षा आहे, तर Vodafone Idea चा विश्वास आहे की 5G ची किंमत 4G पेक्षा जास्त असावी कारण देशातील लोकांना सर्वात वेगवान 5G नेटवर्क मिळेल. आजच्या 4G प्रीपेड प्लान युजर्सना ५०० ते ६०० रुपयांपर्यंतच्या किमतीसह अधिक फायदे मिळतात. त्यामुळे 4G आणि 5G नेटवर्कची किंमत समान श्रेणीत असू शकते असे मानले जात आहे.

वाचा: Smart TV Offers :OnePlus चा स्मार्ट टीव्ही स्वस्तात येणार घरी, मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ, पाहा डिटेल्स

Airtel-Jio 5G

airtel-jio-5g

वृत्तानुसार, पंतप्रधान इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) दरम्यान १९ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे 5G नेटवर्क लॉन्च करणार आहेत. एअरटेलने यापूर्वी अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यासह केवळ 13 शहरांमध्ये 5G सुरू करण्याचे सांगितले आहे. 5G स्मार्टफोन तुम्हाला उच्च वेगाने डाउनलोड करण्याची परवानगी देतात. सामान्यत: 4G नेटवर्कद्वारे ऑफर केलेल्या १० Mb / s ते ५० Mb/s पेक्षा खूप जलद. आहे. एवढेच नाही तर 5G स्मार्टफोन उच्च डेटा ट्रान्सफर स्पीड देतात. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकाल जे सामान्य स्मार्टफोन करू शकत नाहीत.

वाचा : Smartphone Offers: विवोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, सोबत १७ हजार रुपयांपर्यंतची विशेष ऑफर

Jio 5G

jio-5g

5G सेवेसह Jio लाँच केले जाईल : रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी अलीकडेच दावा केला होता की, १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, जीओ संपूर्ण भारतात 5G रोलआउटसह साजरा करतील. १५ ऑगस्ट रोजी Jio ने 5G सेवा लाँच केली नसली तरी, टेलकोसने केलेल्या दाव्यांचा विचार करता ती लवकरच भारतात लाँच केली जाईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. 5G रोलआउटची अपेक्षा आहे पहिल्या काही शहरांमध्ये कंपन्यांनी 5G रोल आउट करणे अपेक्षित आहे.

वाचा : Twitter Tips: ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने सेफ ठेवा तुमचे ट्विटर अकाउंट , हॅकर्स राहतील दूर

5G Rollout

5g-rollout

Airtel 5G रोल आउट कधी होईल ? Airtel CEO गोपाल विट्टल यांनी अलीकडेच सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटर ऑगस्टपासून 5G सेवा सुरू करतील. यासह, कंपनीने असेही सांगितले की, ते सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सन सारख्या मोठ्या टेक कंपन्यांच्या भागीदारीत ऑगस्टच्या अखेरीस भारतात 5G नेटवर्क सुरू करेल. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दूरसंचार कंपनीने हे देखील उघड केले आहे की, एअरटेल २०१४ पर्यंत लहान शहरे, ग्रामीण भाग आणि शहरांमध्ये 5G सेवा आणण्याची योजना आखत आहे.

वाचा : Twitter Tips: ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने सेफ ठेवा तुमचे ट्विटर अकाउंट , हॅकर्स राहतील दूर

5G Speed

5g-speed

इंटरनेट स्पीडची प्रतीक्षा संपली आहे का? भारतात सर्वत्र 5G ची चर्चा आहे. 5G च्या आगमनाने इंटरनेट स्पीड भन्नाट वाढणार असल्याचे सांगण्यात येत असून यामुळे स्मार्टफोन युजर्समध्ये देखील उत्सुकता आहे. लवकरच 5G लाँच होणार आहे, जेणेकरून लोकांना 5G इंटरनेटचा स्पीड अनुभवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना घोषणा केली आहे की, 5G ची प्रतीक्षा संपली आहे, 5G लवकरच भारतात सर्वत्र वितरित करण्यात येईल. सध्या भारतात 5G नेटवर्कच्या रोलआउटबाबत सर्वांचे लक्ष एअरटेल आणि जिओवर आहे.

वाचा: Moto Tab: १०.६१ इंच स्क्रीनसह येणाऱ्या Moto Tab G62 चा पाहिला सेल आज, मिळणार ‘हे’ भन्नाट ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here