नवी दिल्ली : वर्ष २०१२ मध्ये Google Play ची सुरुवात झाली होती. गेल्या १० वर्षात Google Play ने मोठा प्रवास केला आहे. अ‍ॅप्स, गेम्स आणि डिजिटल कंटेंटसाठी १९० देशातील २५ लाखांपेक्षा जास्त लोकं Google Play चा वापर करतात. जवळपास २० लाखांपेक्षा जास्त डेव्हलपर्स Google Play शी जोडलेले आहेत. Google साठी भारत नेहमीच मोठे मार्केट राहिलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरून सर्वाधिक गेम्स आणि अ‍ॅप्सला भारतातच डाउनलोड केले जाते. याच काळात गुगलमध्ये देखील सातत्याने बदल होत गेला आहे. नवीन अ‍ॅप्सचे ट्रेंड होणे आणि लोकांपर्यंत पोहचणे, हेच दर्शवते की गुगल प्रत्येक भारतीय व्यक्तीपर्यंत पोहचले आहे. यामुळे भारतातील लाखो लोकांना नोकरी देखील मिळते.

आकड्यांबद्दल सांगायचे तर वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अ‍ॅप्स डाउनलोड करण्याचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. तर भारताच्याबाहेर हा आकडा १५० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन वर्षात गुगलने शिक्षण, पेमेंट, आरोग्य, मनोरंजन आणि गेमिंगसाठी अनेक अ‍ॅप्सला सादर केले आहे. HealthifyMe फिटनेससाठीचे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे, तर हाय-क्वालिटी इंडियन लँग्वेज स्टोरीटेलिंग अ‍ॅपसाठी Pratilipi बेस्ट आहे. Doubtnut देखील लोकांच्या शिक्षणात मदत करते.

वाचाः ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह Vivo चा भन्नाट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Ludo King चा सर्वात लोकप्रिय गेम्सच्या लिस्टमध्ये समावेश आहे. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांनी या गेमला डाउनलोड केले आहे. PlaySimple Games देखील याचेच उदाहरण असून, जागतिक बाजारात याची लोकप्रियता मोठी आहे. भारतीय अ‍ॅप्सच्या डाउनलोडमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. कंझ्यूमर स्पेंडच्या २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये ८० टक्के वृद्धी पाहायला मिळते.

वाचाः Flipkart वर सुरू आहे भन्नाट सेल, चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत ‘हे’ बेस्टसेलर स्मार्ट टीव्ही

गेल्याकाही वर्षात गुगलने या गोष्टी केल्या लाँच

  • २०१७ – धोकादायक अ‍ॅप्सपासून सुरक्षेसाठी लाँच केले Google Play Protect
  • २०१८ – E-Learning Platform Google Play Academy ला केले लाँच
  • २०१९ – डिजिटल वॉलेटला केले लाँच.
  • २०२० – New Google Play Console ला लाँच केले.
  • २०२१-२२ – Local Startups च्या मदतीने Appscale Academy ची सुरुवात केली.
  • २०२२ – Play Pass आणि Data safety Section ची सुरुवात झाली.

Google Play 2

उद्योग आणि स्टार्टअप्सशिवाय काहीही शक्य नाही. कोणत्याही देशाच्या विकासात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ग्लोबल डेव्हलपर हबमध्ये अ‍ॅप अ‍ॅडप्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गुगल प्ले देखील उद्योगांच्याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावते. स्टार्टअप आणि डेव्हलपर्ससाठी देखील गुगल प्ले स्टोर महत्त्वाचे आहे. Malware वर देखील गुगल स्टोरचे विशेष लक्ष असते. यामुळे पेमेंट देखील सहज शक्य होते.

वाचाः Nothing Phone (1) ची पुन्हा सुरू झाली विक्री, खरेदीसाठी खर्च करावे लागणार जास्त पैसे; पाहा किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here