बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे खरेदी करताना नक्की कोणता फोन घ्यावा याबाबत आपण गोंधळून जात असतो. तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही शानदार स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत, जे दमदार फीचर्ससह येतात व यांची किंमत देखील बजेटमध्ये आहे. तुम्हाला जवळपास ३५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स मिळतील. या किंमतीत बाजारात Vivo V25 Pro, Nothing Phone (1), Oppo Reno 8 5G, Motorola Edge 30 आणि iQOO 9SE 5G सारख्या फोन्सला खरेदी करू शकता. या फोनमध्ये शानदार कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसर आणि दमदार बॅटरी सारखे अनेक फीचर्स दिले आहेत. ३५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Vivo V25 Pro

vivo-v25-pro

काही दिवसांपूर्वीच Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा फोन ८ जीबी + १२८ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन बायोनिक कूलिंग सिस्टमसह येतो. यात ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ४८३० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

वाचाः Flipkart वर सुरू आहे भन्नाट सेल, चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत ‘हे’ बेस्टसेलर स्मार्ट टीव्ही

​Nothing Phone (1)

nothing-phone-1

Nothing Phone (1) स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतात लाँच झाला होता. या फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत सध्या ३३,९९९ रुपये आहे. Nothing चा हा पहिला वहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ६.५५ इंच FHD+ OLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ७७८जी+ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तर रियरला ५० मेगापिक्सल + ५० मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल.

​Oppo Reno 8 5G

oppo-reno-8-5g

Oppo Reno 8 5G स्मार्टफोनची किंमत ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. फोनची किंमत जवळपास २९ हजार रुपये आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १३०० चिपसेटचा सपोर्ट मिळेल. यात ६.४३ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह Vivo चा भन्नाट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

​Motorola Edge 30

motorola-edge-30

Motorola Edge 30 स्मार्टफोनच्या ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा शानदार FHD+OLED डिस्प्ले दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Motorola Edge 30 मध्ये ४०२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, स्नॅपड्रॅगन ७७८+ चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

​iQOO 9SE 5G

iqoo-9se-5g

iQOO 9SE 5G ची किंमत ३२,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये ६.६२ इंच फुल HD+ AMOLED डिस्प्लेचा सपोर्ट दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः Google Play ला १० वर्ष पूर्ण, फिटनेसपासून ते गेमिंगपर्यंत प्रत्येक भारतीय व्यक्तीची ‘या’ अ‍ॅप्सला पसंती

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here