नवी दिल्लीः मेसेजिंगसाठी जगभरात स्मार्टफोन युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहे. परंतु, आता हे समोर आले आहे की, युजर्संचे फोन नंबर गुगल सर्चमध्ये दिसत आहे. एका रिसर्चर्सच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप अकाउंटवरून लिंक फोन नंबर कोणीही गुगल सर्चवर पाहू शकतात. हा एक मोठा खासगी प्रश्न निर्माण झाला आहे. रिसर्चरने इशारा दिला आहे की, व्हॉट्सअॅपच्या ‘Click to Chat’ फीचरमुळे युजर्संचे मोबाइल नंबर संकटात सापडले आहेत. कारण, हे गुगल सर्च केल्यानंतरही कुणीही हे नंबर पाहू शकतात. तसेच या नंबरवर करु शकतात.

वाचाः

बग बाऊंट हंटर अतुल जयराम यांनी या कमतरतेची माहिती शोधून काढली आहे. युजर्संचे फोन नंबर लीक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एक सिक्योरिटी बग मानून म्हटले की, व्हॉट्सअॅप युजर्सची खासगी माहिती संकटात आहे. व्हॉट्सअॅपचा ‘Click to Chat’ फीचर युजर्सला वेबसाइटर व्हिजिटर्ससोबत चॅटिंग करण्याचा सोपा ऑप्शन देत आहे. ही फीचर कोणत्याही क्विक रिस्पॉन्स क्यू आर कोड इमेज च्या मदतीने काम करतो. किंवा कोणत्याही यूआरएल वर क्लिक केल्यानंतर चॅटिंगची मजा घेऊ शकते.

फीचरमुळे नंबर सार्वजनिक
साईटवर आलेल्या व्हिजिटरना देण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर किंवा लिंकवर क्लिक केल्यानंतर चॅटिंग करता येऊ शकते. यासाठी व्हॉट्सअॅप नंबरची गरज नाही. एकदा चॅटिंग सुरु झाली की त्यानंतर व्हिजिटर नंबर दिसतो. जयरामने म्हटले की, मोबाइल नंबर थेट गुगल सर्चमध्ये दिसत आहे. कारण, सर्च इंजिन चॅट मेटाडेटाला इनडेक्स करतो. युजर्संना मोबाइल नंबर https://wa.me/<0Phone Number]> यूआरएल म्हणून गुगलवर दिसतो.

व्हॉट्सअपने म्हटले बग नाही
व्हॉट्सअॅपने म्हटले की, Click to Chat युजर्संना देण्यात आलेल्या एका फीचरमुळे आणि यातील सिक्योरिटी किंवा खासगी माहिती संदर्भात काहीही बग नाही. युजर्संचे नंबर ऑनलाइन उपलब्ध आहेत. पब्लिक साईट्स वर चॅटिंग साठी युजर्संना ऑप्शन देण्यात आला आहे. तर रिसर्चरने म्हटले की, युजर्संना याची माहिती नाही. त्यांचे नंबर गुगल सर्च मध्ये प्लेन टेक्स्ट प्रमाणे दिसत आहे. या नंबरचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अनेक युजर्संच्या प्रोफाईल फोटोच्या मदतीने सोशल अकाउंट्सपर्यंत पोहोचला जाऊ शकतो.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here