Camera Smartphones: स्मार्टफोन खरेदी करताना जर तुम्ही सर्वात आधी फोनचा कॅमेरा तपासत असाल तर ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे, आजच्या काळात फोनच्या कॅमेऱ्याद्वारे उत्तमोत्तम फोटो सहज क्लिक करता येतात. या प्रकरणात, तुमची स्वतंत्रपणे कॅमेरा खरेदी करण्याची गरज संपते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर, सध्या मार्केटमध्ये अनेक एकापेक्षा एक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. या लिस्टमध्ये Google Pixel 6a, Samsung Galaxy S22 Ultra, Realme GT 2 Pro, iPhone 13 आणि Oppo Reno 8 Pro 5G सारखे पर्याय खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय येथे आहेत.लिस्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या या स्मार्टफोन्सचा कॅमेरा तर दमदार आहेच, शिवाय, इतर फीचर्सही हिट आहेत.

​Oppo Reno 8 Pro 5G

oppo-reno-8-pro-5g

Oppo Reno 8 Pro 5G मध्ये ६.७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४१४ पिक्सेल आहे. प्रोसेसरसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max (5 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे,८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे.३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ८० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh बॅटरी आहे,फोनची किंमत ४५००० रुपये आहे.

वाचा: Moto Tab: १०.६१ इंच स्क्रीनसह येणाऱ्या Moto Tab G62 चा पाहिला सेल आज, मिळणार ‘हे’ भन्नाट ऑफर्स

​Realme GT 2 Pro

realme-gt-2-pro

Realme GT 2 Pro मध्ये ६.७ इंचाचा LTPO2 AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १४४० x ३२१६ पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आहे. ऑपरेटिंग फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करते. Realme GT 2 Pro मध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम SM8450 स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 (4 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Realme GT 2 Pro रियरमध्ये ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि अपर्चरसह ३-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ३२ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. फोनची किंमत ४९,९९९ रुपये आहे.

वाचा: Broadband Plans: ३३०० GB डेटा आणि २०० Mbps स्पीड ऑफर करणारे ‘हे’ स्वस्त प्लान प्रत्येकासाठीच बेस्ट, पाहा लिस्ट

​Samsung Galaxy S22 Ultra

samsung-galaxy-s22-ultra

Samsung Galaxy S22 Ultra मध्ये ६.८ -इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम SM8450 स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 (4 nm) प्रोसेसर आहे. स्मार्टफोनचा मागील कॅमेरा १०८ -मेगापिक्सेल, दुसरा १०-मेगापिक्सेल कॅमेरा १०-मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा आहे. चौथा कॅमेरा १२ मेगापिक्सेलचे अपर्चर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी, ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S22 Ultra च्या 12GB रॅम आणि 156GB स्टोरेज वेरिएंटची Samsung च्या अधिकृत साइटवर किंमत १,०९,९९९ रुपये आहे.

iPhone 13

iphone-13

iPhone 13 मध्ये ६.१० -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. या iPhone मध्ये Apple A15 Bionic प्रोसेसर देण्यात आला असून हा iPhone iOS 15 वर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या iPhone च्या मागील बाजुला १२ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, फ्रंटमध्ये १२ -मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. iPhone 13 मध्ये 3.5mm जॅक, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS, NFC आणि USB लाइटनिंग आहे. iPhone 13 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये आहे.

वाचा:Best Smartphones : मल्टीटास्किंग आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी ८ GB रॅमसह येणारे ‘हे’ लेटेस्ट स्मार्टफोन्स आहेत बेस्ट

Google Pixel 6A

google-pixel-6a

Google Pixel 6a मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर गुगल टेन्सर (5 एनएम) प्रोसेसर देण्यात आला असून 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजुला १२.२ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Google Pixel 6a च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४३,९९९ रुपये आहे.

वाचा: Smartphone Sale: पहिल्याच सेलमध्ये ७५० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Infinix Hot 12, फोनमध्ये ६००० mAh बॅटरी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here