नवी दिल्लीः भारताचा SmartTV मार्केट गेल्या काही दिवसांपासून वेगाने बदलत आहे. तसेच कमी किंमतीत दमदार क्वॉलिटी आणि फीचर्स देणारे टीव्ही मॉडल लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोन ब्रँड्स सुद्धा टेलिव्हिजन मेकर्सची जागा घेत आहेत. सर्वात जास्त डिमांड अफॉर्डेबल स्मार्ट टीव्हीची आहेत. या सेगमेंटमध्ये शाओमी आणि रियलमीचे ब्रँड्स आधीपासूनच आहे. आता वनप्लस लवकरच एक स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. २ जुलै रोजी लाइव्हस्ट्री मध्ये नवीन टीव्ही मॉडलवरून पडता हटवला जावू शकतो.

वाचाः

सर्वात जास्त युजर्स याच सेगमेंटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करणे पसंत करीत आहेत. शाओमी, रियलमी, TCL आणि VU ब्रँड्स या सेगमेंटमध्ये अनेक टीव्ही लाँच केली आहेत. वनप्लसकडून मोठ्या मार्केटवर नजर आहे. वनप्लसने गेल्या वर्षी TV लाँच केली होती. परंतु, याला प्रीमियम सेगमेंटमध्ये उतरवले होते. कंपनीकडून आता नवीन टीव्ही लाँच केली जाऊ शकते. या सीरिज अंतर्गत स्वस्त किंमतीत टीव्ही लाँच केली जाऊ शकते. या टीव्हीची किंमत १५ हजार रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच २० हजार ते ४० रुपयांच्या रेंजमध्ये एक मिड रेंज सीरिज कंपनी लाँच करु शकते.

मोठ्या मार्केटवर फोकस
काउंटरपॉइंटकडून शेअर करण्यात आलेल्या डेटा नुसार, भारताचा एन्ट्री लेवल स्मार्ट टीव्ही सेगमेंट (२० हजार रुपये कमीत कमी) ४५ टक्के मार्केट कव्हर करतो. मिड लेवल सेगमेंट (२० ते ४० हजार रुपयादरम्यान) मार्केट शेअर ३३ टक्के तसेच अफॉर्डेबल सेगमेंटची ग्रोथ २०२० पहिल्या तिमाहित २०१९ च्या तुलनेत ८० टक्के दिसली.

दोन नवीन सीरिज लाँच होणार
टेक कंपनी वनप्लसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २ जुलै ला कंपनी भारतात दोन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करीत आहे. ऑनलाइन कार्यक्रमात अफॉर्डेबल आणि दुसरी मिडरेंज सीरिजची घोषणा करण्यात येऊ शकते. कंपनी सीईओ पीट लॉ यांनी सांगितले की, वनप्लस टीव्हीची नवीन रेंज युजर्संना त्याच्या किंमतीपेक्षा बेजोड क्वॉलिटी, प्रीमियम डिझाईन आणि बेस्ट इन क्लास डिस्प्ले दिईल. हा कार्यक्रम २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता लाइव्ह स्ट्रीम असणार आहे. वनप्लस टीव्हीची टक्कर शाओमीसोबत होईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here