नवी दिल्लीः विवोने देशात आपली वाय सीरिजचा नवीन हँडसेट सोमवारी लाँच केला आहे. याची आधीच फ्लिपकार्टवर माहिती दिली होती. ची विक्री १० जून पासून सुरू होणार आहे. विवोच्या या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ८ जीबी रॅम, १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 5000mAh देण्यात आले आहे. या फोनला सर्वात आधी एप्रिलमध्ये कंबोडियात लाँच केले होते.

वाचाः

Vivo Y50: ची किंमत

विवो वाय ५० ला भारतात १७ हजार ९९० रुपये किंमतीत लाँच केले आहे. हा स्मार्टफोन आयरिश ब्लू आणि पर्ल व्हाईट कलरमध्ये मिळणार आहे. फोनची विक्री १० जून पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोरवर उपलब्ध होणार आहे. हँडसेट अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि विवो इंडियाच्या ई-स्टोरवर मिळणार आहे.

Vivo Y50: ची खास वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेट होल पंच डिझाईन सोबत आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर व ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. वाय ५० मध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. यात क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

विवोचा हा फोन अँड्रॉयड बेस्ड फनटच ओएसवर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी ४ जी, एलटीई, ड्युल बँड वायफाय, जीपीएस आणि यूएसबी टाईप सी पोर्ट दिले आहेत. फोनमध्ये एक्सिलेरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर, लाईट सेन्सर दिले आहेत. रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here