realme fan festival sale : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर रियलमीचा फॅन फेस्टिव्हल सेल (realme fan festival sale) आला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा सेल २८ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला रियलमीच्या स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर आणि डिस्काउंट मिळणार आहे. सेलमध्ये प्रीपेड ऑर्डर्स वर कंपनी २५०० रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सेलमध्ये रियलमीच्या एकूण चार स्मार्टफोन्सवर सूट दिली जात आहे. या फोनमध्ये रियलमी नार्जो 50i, रियलमी 9i, रियलमी 8, रियलमी 9 प्रो+ 5G स्मार्टफोन सूट व डिस्काउंट दिला जात आहे. तसेच तुम्ही जर ICICI बँकेच्या कार्ड वरून पेमेंट केले तर तुम्हाला २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट मिळतो.

रियलमी नार्जो 50i

-50i

२ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजचा हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर ६ हजार ८९९ रुपये किंमतीच्या टॅग सोबत लिस्ट आहे. सेलमध्ये या फोनला प्रीपेड ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला ६०० रुपयाचा डिस्काउंट मिळेल. रियलमीच्या या फोनमध्ये कंपनी ६.५ इंचाचा डिस्प्ले ऑफर करीत आहे. फोनच्या रियर मध्ये ८ मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेटअप दिला आहे. ऑक्टा-कोर प्रोसेसर वर काम करीत असलेल्या या फोनची बॅटरी 5000mAh दिली आहे.

वाचाः स्मार्टफोनला चार्जिंग करताना यापैकी किती चुका तुम्ही करता?, आजच बंद करा, पाहा टिप्स

​रियलमी 9i

-9i

फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. सेलमध्ये या फोनला तुम्ही २ हजार रुपये डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. हा डिस्काउंट प्रीपेड ऑर्डर्ससाठी आहे. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केले तर तुम्हाला १ हजार रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले शिवाय, 50MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः १९ हजारांचा स्मार्टफोन १० हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर आणि ऑर्डर करण्याची प्रोसेस

​रियलमी 8

-8

४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा हा फोन १५ हजार ९९९ रुपयाचा आहे. प्रीपेड ऑर्डर करणाऱ्या यूजर्सला फोन २५०० रुपये स्वस्त किंमतीत मिळतो. तुम्ही जर ICICI बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला १५०० रुपयाचे इंस्टेंट डिस्काउंट सुद्धा मिळेल. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर दिले आहे.

वाचाः गुड न्यूज! अर्ध्या किंमतीत मिळतोय iPhone 11, ‘असा’ डिस्काउंट पुन्हा नाही

​रियलमी 9 प्रो+ 5G

-9-5g

रियलमीचा हा फोन जबरदस्त फीचर्स सोबत येतो. या फोनचा बेस व्हेरियंट म्हणजेच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी कंपनीच्या साइटवर २४ हजार ९९९ रुपयाच्या प्राइस सोबत लिस्ट आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यानंतर याच्या टॉप एन्ड व्हेरियंट तुम्हाला २५०० रुपये स्वस्त किंमतीत मिळेल. जर या फोनच्या टॉप व्हेरियंटला ICICI बँकेचा कार्ड वापरून खरेदी केल्यास तुम्हाला २ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 920 5G प्रोसेसर आणि 60 वॉटची सुपर डार्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत येतो.

वाचाः स्मार्टफोनला चार्जिंग करताना यापैकी किती चुका तुम्ही करता?, आजच बंद करा, पाहा टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here