वाचाः
फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करणाऱ्या अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फोन खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर अॅक्सिस बज क्रेडिट कार्ड धारकांना ५ टक्के सूट दिली जात आहे.
Samsung ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एम११ ला ३ जीबी रॅम प्लस ३२जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. दोन्ही व्हेरियंटची किंमत अनुक्रमे १० हजार ९९९ रुपये आणि १२ हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
वाचाः
ची किंमत वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी एम०१ ३जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. याची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. यात ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. हँडसेट ब्लू, ब्लॅक आणि रेड या तीन रंगात उपलब्ध आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा ड्युल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवर देण्यााठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times