Free Disney plus Hotstar Plans : Airte, Jio, VI सारख्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा प्लान्स आणि बेनिफिट्स ऑफर करतात. त्यात रिलायन्स जिओची लोकप्रियता अधिक आहे. कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीन रिचार्ज प्लान्स ऑफर करत असते . Jio वापरकर्त्यांना प्रीपेड योजनांच्या विविध श्रेणी निवडण्याचा पर्याय आहे. OTT ची आवड असणाऱ्यांकरिता देखील कंपनी बरेच काही ऑफर करते. रिलायन्स जिओ आपल्या सर्व प्लानमध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema, Jio Cloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. परंतु, कंपनीकडे विशेष श्रेणी प्लान देखील आहे. ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सदस्यता १ वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. जिओच्या खास डिस्ने + हॉटस्टार प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घ्या आणि डिस्ने + हॉटस्टारची सदस्यता १ वर्षासाठी मोफत देणाऱ्या सर्वात बेस्ट प्लानची निवड करा.

Jio 555 Plan

jio-555-plan

५५५ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा अॅड-ऑन पॅक: रिलायन्स जिओच्या ५५५ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकची वैधता ५५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ५५ जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लानमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो. या रिचार्ज पॅकमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा नाही. डिस्ने + हॉटस्टार सुविधा प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी दिली जाते. याशिवाय, रिलायन्स जिओच्या ५५५ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud ची सुविधाही उपलब्ध आहे.

वाचा: Apps Ban: BGMI सह ‘या’ पॉप्युलर चीनी अ‍ॅप्सना भारताने दाखविला घरचा रस्ता, पाहा पूर्ण लिस्ट

Data Add On pack

data-add-on-pack

६५९ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा अॅड-ऑन पॅक: ६५९ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये १.५ GB दैनिक डेटानुसार एकूण ८४ GB डेटा उपलब्ध आहे. प्लानमध्ये उपलब्ध एकूण डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ Kbps पर्यंत घसरतो. हा डेटा अॅड-ऑन पॅक व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधेसह येत नाही. Jio च्या या डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये, Disney + Hotstar सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

वाचा: Smartphone Speed: स्मार्टफोनचे फुल स्टोरेज असे करा फ्री, ‘या’ ट्रिक्स बनवतील तुमच्या फोनला सुपर स्मूथ

Jio 601 Plan

jio-601-plan

रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण ९० GB डेटा देण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. जिओच्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. Reliance Jio चा हा प्रीपेड प्लॅन १ वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सदस्यत्व देखील मोफत आहे.

वाचा : Budget Phone: १० हजारांच्या रेंजमध्ये ६GB रॅम -१२८GB स्टोरेज ऑफर करणारा ‘हा’ स्मार्टफोन आहे स्वस्तात मस्त पर्याय

Jio 2999 Plan

jio-2999-plan

२९९९ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओच्या २९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण ९१२.५ जीबी डेटा वापरू शकतात. डेली डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या रिचार्ज प्लानमध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. Jio च्या या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील मोफत आहे. या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत आहे.

वाचा: बजेट किमतीत OPPO Enco Buds2 लाँच, बड्स पाण्यात होणार नाही खराब, पाहा फीचर्स

Jio 1066 Plan

jio-1066-plan

४९९ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ५६ जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सदस्यत्व आहे.

रिलायन्स जिओचा १०६६ रुपयांचा प्लान: वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये ५ जीबी डेटा देखील देण्यात आला आहे. दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० SMS मिळतात. Jio च्या या प्लानमध्ये Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.

वाचा: Smartwatch: स्मार्टवॉच मार्केटमधील चीनच्या वर्चस्वाला भारताची जोरदार टक्कर, केली अधिक विक्री स्मार्टवॉचेसची, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here