जगभरात whatsapp चे २ अब्ज युजर्स आहेत. whatsapp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅपपैकी एक आहे. या प्लॅटफॉर्मवर लागोपाठ नवीन- नवीन फीचर्स येत आहेत. कंपनीने या आधी आपल्या युजर्संसाठी डार्क मोड फीचर आणले होते. त्यानंतर व्हिडिओ स्टेट्स फीचर्स सुद्धा आणले आहे. व्हॉट्सअॅपने कॉलिंग मर्यादा वाढवून ती आता ८ करण्यात आली आहे. फॉरवर्ड मेसेजच्या मर्यादेत सुद्धा बदल करण्यात आले आहे. करोना संकटाच्या काळात फेक न्यूजला आळा घालण्यासाठी कंपनी सर्व प्रयत्न करीत आहे. व्हॉट्सअॅप कंपनी लागोपाठ नवे फीचर्स आणत असल्याने युजर्संची चॅटिंगची मजा वाढण्यास मदत होते. व्हॉट्सअॅप कंपनी आता पुन्हा एकदा आणखी नवीन ५ फीचर आणत आहेत. जाणून घ्या हे कोणते नवीन फीचर्स आहेत….

व्हॉट्सअॅप कंपनी अनेक महिन्यांपासून या फीचरची चाचणी करीत आहे. हे फीचर रोल आऊट झाल्यानंतर युजर्संना एकाच व्हॉट्सअॅप अकाउंट सोबत मल्टीपल डिव्हाईसचा वापर करता येणार आहे. सध्या जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप एखाद्या ठिकाणी लॉग इन केले तर दुसऱ्या ठिकाणी ते करता येत नाही. नाही तर आधीच्या ठिकाणी ते लॉग आउट होते. परंतु, आता कंपनी मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचर आणत आहे. हे फीचर आल्यास तुम्हाला विविध ठिकाणी तुमचे व्हॉट्सअॅप लॉग इन करता येऊ शकणार आहे.

या फीचरची सुद्धा खूप दिवसांपासून वाट पाहावी लागत आहे. या फीचरवर कंपनी खूप दिवसांपासून काम करीत आहे. त्याची चाचणी करीत आहे. परंतु, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे फीचर आल्यानंतर हे व्हॉट्सअॅपचे डिलीट मेसेज सारखे असणार आहे. यात व्हॉट्सअॅप ऑटोमॅटिक मेसेज डिलिट करेन. हे मेसेज किती वेळात गायब होऊ शकतात. याची वेळ स्वतः युजर्संच ठरवतील. युजर्संना प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन किंवा चॅटिंग बॉक्समध्ये जाऊन एक-एक मेसेज डिलीट करावा लागणार नाही. टायमिंग सेट केल्यानंतर ते मेसेज आपोपाप डिलीट होत जातील.

QR code स्कॅनर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉयड बीटा व्हर्जनमध्ये आले आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्स आता क्यूआर कोड स्कॅन करुनही नवीन व्हॉट्सअॅप नंबर कॉन्टॅक्ट जोडू शकतो. तसेच प्रत्येक युजर्सला क्यूआर कोड असणार आहे. हे फीचर लवकरात लवकर युजर्संना जारी करण्यात येईल. व्हॉट्सअॅपमध्ये हे येणारे फीचर्स जबरदस्त आहेत. या नवीन फीचरमुळे युजर्संना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांची चॅटिंग मजा डबल होणार आहे. तसेच बऱ्याच गोष्टी या नवीन फीचरमुळे सोप्या वाटणार आहेत.

व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच हे इन अॅप ब्राउझर फीचर येत आहे. हे फीचर रोल आऊट झाल्यानंतर युजर्संना व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंक याच अॅपवर ओपन करु शकतील. आता व्हॉट्सअॅप आलेल्या लिंक ओपन करण्यासाठी अन्य कोणत्या तरी ब्राउझरची मदत घ्यावी लागते. दुसऱ्या ब्राउझरवर जावे लागेत. परंतु, व्हॉट्सअॅपने हे खास फीचर आणले आहे. अनेकदा लिंक ओपन होत नाही. कधी-कधी नेट स्लो होते. त्यामुळे हे फीचर आल्यानंतर युजर्संना मोठी मदत मिळणार आहे. कोणतीही लिंक ओपन करण्यासाठी आता कोणत्याही ब्राऊझरवर जायची गरज भासणार नाही.

व्हॉट्सअॅपवर आपण किती वेळ ऑनलाइन राहतो हे काही निवडक लोकांनाच दिसले पाहिजे, असे आपल्याला वारंवार वाटते. परंतु, व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर आणत आहे. त्यामुळे आपल्या व्हॉट्सअॅपचे लास्ट सीन काही निवडक लोकांनाच दिसेल. तुम्ही ठरवू शकाल की, तुमचे लास्ट सीन कोणी पाहिले पाहिजे कोणी नाही. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये युजर्संना Contact, Everyone आणि None हे तीन पर्याय मिळतात. कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्वांना लास्ट सीन दिसतात. एव्हरीवन सिलेक्ट केल्यास सर्वांना दिसते. तर नन केल्यानंतर कुणालाही लास्ट सीन दिसत नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here