नवी दिल्लीः गेल्या दोन महिन्यापासून जगभरात करोना व्हायरसचे संकट आहे. परंतु, चीनची कंपनी विवोसाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीच्या स्मार्टफोनला ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे. एस ६ सीरिजच्या फोनच्या गेल्या दोन महिन्यात १० लाख युनिटची विक्री करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा एक ५ जी स्मार्टफोन आहे. या फोनला कंपनीने एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते.

वाचाः

फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Exynos 980 5जी चिपसेट देण्यात आला आहे. विवो आणि सॅमसंगने याला तयार केले होते. हे चिपसेट युजर्सला 3.55Gbps पर्यंत डाऊनलोड स्पीड देऊ शकतो. चीनमध्ये या 128GB मॉडलची किंमत २६९८ युआन (२८ हजार रुपये) आणि 256GB मॉडलची किंमत २९९८ (३२ हजार रुपये) आहे.

फोनचे खास फीचर
फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात नाइट सेल्फी एक्सपिरियन्स आहे. फोनमध्ये देण्यात आलेला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा कमी प्रकाशात जबरदस्त सेल्फी देतो. लो – लाइट मध्ये सेल्फी घेण्यासाठी फोनमध्ये सॉफ्ट रिंग फिल लाइट टेक्नोलॉजी मिळते. यात देण्यात आलेल्या 4500mAh बॅटरीला १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

फोनचे खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लसचा अमोलेड डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये फ्रंटला कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू या तीन रंगात उपलब्ध आहे. यात क्वॉड कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here