जर तुम्हाला एका स्मार्टफोनवरून दुसऱ्या स्मार्टफोनवर कोणतीही मोठी फाईल पाठवायची असेल तर तुम्हाला Shareit किंवा Xender या सारख्या कोणत्या तरी अॅपची गरज घ्यावी लागते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असा एक इनबिल्ट फीचर येते. जी फाईल पाठवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अॅपची गरज लागत नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही जर दोन स्मार्टफोन जवळ आणले तर मोठ्यातील मोठी फाईल एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये पाठवता येऊ शकते. बऱ्याचदा एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये फोटो, व्हिडिओ, चित्रपट, आणि अन्य काही पाठवायचे असल्यास शेअर इट आणि अन्य थर्ड पार्टीच्या अॅपची मदत घ्यावी लागते. व्हॉट्सअॅपवरून काही फोटो व्हिडिओ पाठवता येतात. परंतु, त्या फार मोठ्या असत नाहीत. त्यामुळे मोठ्या फाईल पाठवायच्या असतील तर अन्य अॅप्सची मदत घ्यावी लागते.

सध्या स्मार्टफोनमध्ये NFC (नियर-फील्ड कम्यूनिकेशन) टेक्नोलॉजी दिली जात आहे. NFC द्वारे फोनमध्ये Android Beam नावाचे फीचर काम करीत असते. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट पासून डेटा ट्रान्सफरचे काम अगदी सुरक्षित पणे करु शकता. परंतु, सर्वच स्मार्टफोनमध्ये हे फीचर येत नाही. त्यामुळे तुमचा मोबाइल कोणत्या कंपनीचा आहे. किती महागडा आहे. त्या फोनमध्ये हे फीचर आहे का, हे आधी तपासून घ्यावे लागते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये किंवा दुसऱ्या मोबाइलमधून तुमच्या मोबाइलमध्ये मोठी फाईल सेंड करता येऊ शकते.

तुमच्या फोनमध्ये हे फीचर आहे की नाही. हे जाणून घेणे सोपे आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला सेटिंग्समध्ये जावे लागेल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्च चे ऑप्शन मिळाला तर त्याला NFC सर्च करुन पाहा. नाही तर Device Connection ऑप्शनमध्ये जावू शकता. या ठिकाणी जर तुम्हाला NFC लिहिलेले आढळले तर तुमच्या फोनमध्ये अँड्रॉयड बीमचे फीचर सुद्धा मिळू शकेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही अॅपविना मोठ्यातील मोठी फाईल एकमेकांना पाठवू शकता.

फाईल सेंड करण्यासाठी अँड्रॉयड बीम ला इनेबल करावे लागते. या साठी डिव्हाईसच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. Device Connection ऑप्शन मध्ये गेल्या नंतर NFC ला ऑन करावे लागेल. असे केल्यानंतर याच्या खाली अँड्रॉयड बीम चा Android Beam पर्याय ऑटोमॅटिक ऑन होईल. हा पर्याय ऑन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये कोणतीही मोठी फाईल पाठवू शकता. फाईल पाठवण्यासाठी तुम्हाला शेअर इट किंवा अन्य अॅप्सची गरज भासणार नाही.

Android Beam ला इनेबल केल्यानंतर तुम्ही वेब पेज पासून, यूट्यूब व्हिडिओ, कॉन्टॅक्ट आणि मल्टी मीडिया फाईल्स पर्यंत पाठवू शकता. ज्या फोनमध्ये तुम्हाला फाईल पाठवायच्या आहेत. त्या फोनमध्ये सुद्धा Android Beam इनेबल करा. मग दोन्ही फोनला पाठीमागून टच करा. आता तुम्हाला जी फाईल पाठवायची आहे. त्यावर लिहिलेल्या Tap To Beam ऑप्शनवर टॅप करा. इतके केले की, फाईल एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये सहज आणि अत्यंत वेगाने जाईल. फाईल पाठवण्यासाठी तुम्हाला अन्य अॅप्सची गरज भासणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here