Amazon Sale On Samsung Phone : अलीकडेच सॅमसंगचा (Samsung) एक नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. लॉन्च होताच, हा स्मार्टफोन खूप लवकर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोबाईलच्या यादीत सामील झाला. सॅमसंगने या स्मार्टफोनवर तसेच या आधीच्या सॅमसंग सीरिजच्या आणखी दोन स्मार्टफोनवर सर्वोत्तम डील काढली आहे. या स्मार्टफोनवर 20% पर्यंत सूट, 12 प्लस एक्सचेंज बोनस आणि 2,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे.

1-Samsung Galaxy M13 (Aqua Green, 4GB, 64GB Storage) | 6000mAh Battery | Upto 8GB RAM with RAM Plus Samsung Galaxy M13

हा सॅमसंगचा सर्वात नवीन लॉन्च केलेला स्मार्टफोन आहे. ज्याची विक्री वेगाने होत आहे. स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटमध्ये आहेत ज्यात एक 4G आणि दुसरा 5G स्मार्टफोन आहे. पहिल्या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे, जो 20% सवलतीनंतर 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ICICI बँक कार्डने स्मार्टफोन विकत घेतल्यास 1,000 रूपयांचा कॅशबॅक आणि 11,250 चा एक्सचेंज बोनस आहे. 5G व्हेरिएंट 13,999 मध्ये उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. स्मार्टफोनमधील दुसरा कॅमेरा 5MP अल्ट्रावाईड आहे आणि तिसरा कॅमेरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये ऑटोफोकसची सुविधा देखील आहे. फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.6-इंच स्क्रीन आहे. ज्याचा डिस्प्ले HD + LCD पॅनेल आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

2-Samsung Galaxy M33 5G (Deep Ocean Blue, 6GB, 128GB Storage) | 5nm Processor | 6000mAh Battery | Voice Focus | Upto 12GB RAM with RAM Plus

जर तुम्हाला 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगला सॅमसंग फोन घ्यायचा असेल तर या फोनची किंमत आणि फीचर्स नक्की पहा. 24,999 रुपयांची ही फोन ऑफर ऑफरमध्ये 24% डिस्काउंटनंतर 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि ICICI बँक कार्डने फोन पेमेंट केल्यावर 2 हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक तसेच 12,750 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये ऑब्जेक्ट इरेजर आणि बोकेह मोड आहे. फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅटरीमध्ये 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले तसेच गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

3-Samsung Galaxy M53 5G (Deep Ocean Blue, 6GB, 128GB Storage) | Travel Adapter to be Purchased Separately

जर तुम्हाला चांगला कॅमेरा असलेला फोन 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत घ्यायचा असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी M53 5G हा सर्वोत्तम फोन आहे. Samsung Galaxy M53 5G मधील मुख्य कॅमेरा 108mp आहे. फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ऑब्जेक्ट इरेजरची सुविधा आहे ज्यामुळे तुम्ही फोनमधील अतिरिक्त वस्तू साफ करू शकता.तसेच फोनमध्ये बॅकग्राउंड ब्लर करण्याची सुविधा आहे.
या फोनची खासियत म्हणजे याची डिझाईन सुपर स्लिम आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED प्लस- Infinity O FHD डिस्प्ले आहे. तसेच टिकाऊपणासाठी गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे. फोनमध्ये डॉल्बी अॅटम्स साउंड आहे. तसेच, या फोनवरून व्हिडिओ कॉल्स किंवा ऑडिओ कॉलमध्ये पार्श्वभूमी आवाज कमी आहे, ज्यामुळे तुम्ही सहज कॉल करू शकता.
स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये आहे. परंतु, लॉन्चिंग ऑफरमध्ये 20% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही तो 26,499 रुपयांना खरेदी करू शकता. ICICI बँक कार्ड पेमेंटवर 2,500 रुपयांची सूट आहे. या स्मार्टफोनवर 12,750 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here