ट्रस्टच्या माहितीनुसार, याआधीही अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. परंतु, त्यावर रेकॉर्डेड अजान होत होती. जामा मशीदच्या नवीन ॲप Al Islaah मध्ये यूजर्संना लाइव्ह अजान प्ले करण्याची संधी मिळणार आहे. ट्र्स्टच्या म्हणण्यानुसार, नमाजासाठी लोकांना बोलावणे हे धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे. या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल.
ट्रस्टचे काय आहे म्हणणे
मशीद ट्रस्टचे चेअरमन Shuaib Khatib ने सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या लाउडस्पीकर गाइडलाइन्स केवळ अजानसाठी नसून सर्वांसाठी आहेत. परंतु, एका पार्टीकडून राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. या उद्भवलेल्या वादानंतर आम्ही बैठकीत यावर तोडगा शोधून काढला आहे. सर्वात आधी आम्ही एक रेडिओ फ्रिक्वेंसी घेण्याचा विचार केला. परंतु, त्यासाठी खूप परवानग्या लागत होत्या. त्यामुळे आम्ही एक ॲप डेव्हलप केला आहे. या ॲपवर सकाळी नमाज ऐकू शकाल. जे लाउडस्पीकरवर परवानगी नाही. महाराष्ट्र कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ॲपला डेव्हलप करण्यास मदत केली आहे.

मिळतील अनेक फीचर्स
या ॲपवर यूजर्सला अनेक दुसरे फीचर्स मिळतील. यावर एक पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे. याच्या मदतीने मशीद अथॉरिटी लोकांना कोणतीही माहिती देवू शकेल. याशिवाय, ॲप यूजर्स कम्यूनिटी लीडर्सला आपले प्रश्न पाठवू शकाल. याचा वापर जुम्मेसाठी केला जावू शकेल. या ॲपला आयओएस आणि अँड्रॉयड अशा दोन्ही व्हर्जनवर वापरता येईल.
वाचाः OnePlus ने लाँच केले नवीन वायर्ड ईयरफोन, किंमत ७९९ रुपये, १ सप्टेंबरपासून विक्री
वाचाः पॉवर कट दरम्यान सतत ४ तास लाइटिंग बॅकअप देतो ‘हा’ Inverter LED Bulb, किंमत कमीच
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times