नवी दिल्लीः शाओमीने () अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन कंपनीने सध्या स्पेनमध्ये लाँच केला आहे. फोनला दोन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन 3GB + 32GB / 4GB + 64GB व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. स्पेनमध्ये या फोनची किंमत १२,८३१ रुपये आणि १५४०० रुपये ठेवण्यात आली आहे. फोनला कार्बन ग्रे सनसेट पर्पल आणि ओशियन ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

रेडमी ८ चा सक्सेसर नवीन रेडमी ९
मागील वर्षी लाँच झालेल्या रेडमी ८ चा सक्सेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंग सोबत येतो. डिस्प्लेवर प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ देण्यात आले आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम सोबत ३२ जीबीचा स्टोरेज दिला आहे. तसेच ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबीचा स्टोरेज दिला आहे. नवीन रेडमी ९ मध्ये या फीचर्सला अपग्रेड करण्यात आले आहे.

भारतात किती असू शकते किंमत
या फोनची भारतात किंमत किती असू शकते. या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप काही समोर आली नाही. परंतु, याआधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४९ डॉलर म्हणजेच जवळपास ११ हजार २५० रुपये असू शकते. तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३९ डॉलर म्हणजेच १० हजार ५०० रुपये असू शकते. हे तीन कलर ऑप्शनमध्ये ग्रीन, सनसेट पर्पल आणि ग्रे मध्ये खरेदी केला जाऊ शकते.

वाचाः

वाचाः

रेडमी ९ मध्ये हे फीचर्स
नवीन रेडमी ९ स्मार्टफोनमध्ये युजर्सना Mediatek चे Helio G80 प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. तसेच फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. रेडमी ९ स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 13MP + 8MP + 5MP + 2MP चे चार कॅमेरे दिले आहे. कंपनीने रेडमी ९ मध्ये पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G , VoLTE, सिंगल बँड (2.4 GHz) WiFi, ब्लूटूथ 5.0, GPS, वायरलेस FM यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here