नवी दिल्लीः शाओमीने भारतात आपली Mi Notebook सीरिज लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत आणि लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही लॅपटॉपची किंमत अनुक्रमे ४१ हजार ९९९ रुपये आणइ ५४ हजार ९९९ रुपये आहे. हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० ओएसवर चालतात. जाणून घ्या या लॅपटॉपविषयी.

Mi Notebook 14 होराइजन एडिशनचे वैशिष्ट्ये
होराइजन एडिशनसोबत कंपनीने प्रसिद्ध लाईट आणि पोर्टेबल अल्ट्रा बुक कॅटेगरीत एन्ट्री केली आहे. १.३५ किलोग्रॅमचे वजन असलेल्या या लॅपटॉपमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात १४ इंचाचा फुल एचडी होराइजन डिस्प्ले दिला आहे. लॅपटॉप ९१ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशयो सोबत येतो. लॅपटॉपमध्ये सिजर स्विच की बोर्ड, स्टिरियो स्पीकर, मल्टी टच, ट्रॅकपॅड आणि यूएसबी ३ पोर्ट्स देण्यात आले आहेत.

लॅपटॉपमध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हा लॅपटॉप १० तासांचा बॅक अप देतो. ६५ वॅटची चार्जरसोबत हा ३५ मिनिटात शून्य ते ५० टक्के चार्ज होतो.

हा लॅपटॉप ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबीच्या SATA SSD स्टोरेज सोबत येतो. या लाईनअपच्या प्रीमियम व्हेरियंटमध्ये ८ जीबी रॅम सोबत ५१२ जीबी PCi Express Gen 3 NVMe SSD मिळतो.

Mi Notebook 14
हा शाओमीचा स्वस्तातील लॅपटॉप आहे. यात १४ इंचाचा होराइजन डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले फुल एचडी रिझॉल्यूशन आणि ९१ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो सोबत येतो. कंपनीने या लॅपटॉपला तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. सीरिजमधील सर्वात ट़ॉप अँड व्हेरियंटमध्ये ५१२ जीबीच्या SATA SSD स्टोरेज मिळतो. लॅपटॉपमध्ये इंटेलच्या अल्ट्रा एचडी ग्राफिक कार्ड लावण्यात आले आहेत. या सीरिजमध्ये सर्व लॅपटॉप इंटेल १० जनरेशन कोर i5 प्रोसेसर सोबत येतात. लॅपटॉपमध्ये ८ जीब रॅम सोबत Mi Webcam HD मिळतो.

पुढील आठवड्यात सुरू होणार सेल
या दोन्ही लॅपटॉपचा सेल १७ जून २०२० रोजी सुरू होणार आहे. युजर्संना अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीची अधिकृत वेबसाईटवरून हे दोन्ही लॅपटॉप खरेदी करता येऊ शकतील.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here