वाचाः
नोकियाचा फोन टीझर आला
नोकिया मोबाइल्स इंडिया ने आपल्या ट्विटर हँडलवरून एक टीझर रिलीज केला आहे. १० सेकंदांच्या या टीझर व्हिडिओमध्ये Nokia 5310 चा लूक अनेकदा पाहायला मिळतो. ट्विटमध्ये लिहिलेय, आम्ही आयकॉनिक म्यूझिक फोन परत आणत आहोत. टीझर व्हिडिओत सांगितले की, ५ दिवसांत येतो. त्यामुळे यावरून संकेत मिळतात की, हा फोन १६ जून ला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. नोकिया फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने लाँच आधीच वेबसाईटवर नोंदणी सुरू केली आहे. नोकियाचा हा फोन व्हाईट, रेड आणि ब्लॅक, रेड रंगात उपलब्ध होईल.
नोकिया फोनचे खास वैशिष्ट्ये
नोकियाचा हा फोन ग्लोबल बाजारात आधीच समोर आलेला आहे. फीचर फोन नोकिया ३० प्लस सॉफ्टवेअरवर चालतो. फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA कलर डिस्प्ले दिला आहे. ड्यूल फ्रंट फेसिंग स्पीकर्स आणि फिजिकल की पॅड देण्यात आले आहेत. नोकियाचा हा फोन मीडियाटेक MT6260A प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ८ एमबी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये १६ एमबीचा इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
फोनच्या रियरमध्ये फ्लॅश सोबत VGA कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 1,200 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ३० दिवस स्टँड बाय आहे, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये MP3 प्लेयर आणि FM रेडियो यासारखे फीचर दिले आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times