नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत जात आहे. तसेच व्हॉट्सअपची चॅटिंग मजा सुद्धा आता मोठी होत आहे. कोणत्याही चॅट बॉक्समधून एखादा मेसेज शोधून काढणे आता जिकीरीची होऊन बसले आहे. परंतु ही अडचण सुद्धा सोडली आहे. कंपनी आता सर्च बाय डेट Search by date फीचर आणण्याची तयारी करीत आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्संना तारखेनुसार, मेसेज शोधता येऊ शकणार आहेत.

वाचाः

wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे. फीचरला लवकरच जारी करण्यात येईल. कंपनी याची टेस्टिंग करीत आहे. युजर्संना ही सुविधा कधी पर्यंत मिळू शकेल, यासंबंधी आताच बोलणे थोडे घाईचे होईल. व्हॉट्सअॅप या फीचरला सर्वात आधी आयफोन युजर्संसाठी आणेल. त्यानंतर ही सुविधा अँडॉयड डिव्हॉईससाठीही कंपनी देईल, अशी आशा आहे.

या प्रमाणे काम करणार हे फीचर
व्हॉट्सअॅपवर मेसेज सर्च करण्याचा ऑप्शन आता सुद्धा येतो. परंतु, यात तुम्हाला सर्च ऑप्शन मध्ये जाऊन मेसेज काही शब्द लिहावे लागते. ज्या शब्दाचा मेसेजमध्ये वापर करण्यात आला आहे. त्याचा वापर करावा लागतो. त्यानंतर ते मेसेज दिसतात. परंतु, जर तुम्हाला तुमच्या तारखेनुसार मेसेज शोधणे व्हॉट्सअॅपची सुविधा मिळेल.

कंपनीला सर्च बाय डेट फीचरची गरज आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्संना एक कॅलेंडर सारखे आयकॉन दिसेल. युजर्संना या ठिकाणी तारीख निवडावी लागेल. त्यानंतर त्या तारखेचे सर्व मेसेज दिसतील. तसेच, कंपनी मल्टिमीडिया सपोर्ट, क्यूआर कोड स्कॅनर, ऑटोमॅटिक मेसेज डिलीट आणि इन अॅप ब्राऊजर यासारखे फीचर्स लवकरच येणार आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here