जगभरात मेसेजिंग अॅप्स पैकी व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपला खूप मोठी मागणी आहे. जगभरात २ अब्ज ही व्हॉट्सअॅपचा वापर करणारी संख्या असल्याची माहिती आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप असे सूत्र सध्या भारतात तरी पाहायला मिळते. छोट्या मुलांपासून ते ऑफिस कर्मचारी आणि गृहिणी ते नोकरदार महिला या सर्व गटातील व्यक्तींकडे व्हॉट्सअ हे फीचर जवळपास आहे. व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करीत आहे. हे फीचर्स महिन्याभरात रोल आऊट केले जाणार आहेत. यात एक फीचर असे आहे जे तारीख नुसार मेसेज सर्च करण्यास मदत करेल. तसेच रिडाईजन स्टोरेज युसेज सेक्शन, स्टार मेसेज शिवाय सर्व मेसेज सर्च करता येणार आहे. तसेच सर्व मेसेज डिलिट, शेअरचॅट व्हिडिओ, इंटिग्रेशन आणि न्यू मेसेजिंग बबल्स या सारखे फीचर्स कंपनी आणण्याची तयारी करीत आहे. जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील अपकमिंग फीचर्स संबंधी माहिती….

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये शेअरचॅट व्हिडिओजसाठी एक वेगळा प्लेअर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच हे फीचर इंस्टाग्राम किंवा यूट्यूब व्हिडिओ प्ले करणे या सारखे काम करू शकतो. रिपोर्टमध्ये म्हटले की, शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटनुसार, ShareChat मधून व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडिओ साठी Picture-in-Picture (PiP) ऑप्शन मिळेल. व्हॉट्सअॅपने या आधी अनेक फीचर्स आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संना मोठा फायदा झाला असून त्यांची चॅटिंग मजा दुप्पट झाली आहे.

व्हॉट्सअॅप आयफोन युजर्संसाठी लवकरच वेबवर सर्च इमेज फीचर येवू शकतो. कंपनीने मागील काही वेळा अँड्रॉयड युजर्संसाठी इमेज फीचरची चाचणी केली जात आहे. या फीचरमुळे युजर्संना व्हॉट्सअॅप चॅट मध्ये मिळालेल्या कोणत्याही फोटोला इंटरनेट सर्च करता येऊ शकणार आहे. या फीचरमुळे फेक न्यूजला आळा घातला जाऊ शकतो. जगभरात करोना व्हायरसचे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. परंतु, काही जणांकडून करोना संकटातही फेक न्यूज पसरवल्या जात आहेत.

व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक मोठे फीचर येऊ शकते. डार्क मोडवर स्विच केल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये बबल नवीन कलरमध्ये आणण्याचे काम केले जात आहे. WABetaInfo कडून शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटच्या माहितीनुसार, या नवीन फीचर मुळे कमी लाईटमध्येही व्हॉट्सअॅप चालवणाऱ्या युजर्संना डोळ्यावर जास्त जोर देण्याची गरज लागणार नाही. युजर्स सहज या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप चॅटिंगची मजा घेऊ शकतील. या आधी कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये डार्क मोड फीचर आणले आहे. हे डार्क मोड फीचर अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये दिवसभरात हजारो मेसेज धडाधड येत असतात. यातील बरेज मेसेज वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. परंतु, ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी त्यातील वाचायाचे मेसेज खूपच खाली गेलेले असतात. हे मेसेज सोधून ते वाचणे मोठे जिकिरीचे आहे. WABetaInfoच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपध्येलवकरच सर्च बाय डेट फीचर येणार आहे. म्हणजेच युजर्संना केवळ तारीख टाकून मेसेज सर्च करता येणार आहेत. रिपोर्टनुसार, कीबोर्ड वर एक कॅलेंडर आयकॉन दिसेल. त्यात चॅट बॉक्स पर्यायावर युजर्सं डेट एन्टर करतील. नवीन फीचर्सच्या इन चॅट सर्च डिझाईनला डिझाईन मिळण्याची शक्यता आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप Storage Usage sectionला रिडिझाईन करीत आहे. लार्ज फाईल ऑप्शन सोबत येईल. यात युजर्संच्या मोठ्या फाईल्स सुद्धा व्ह्यू करता येणार आहेत. तसेच फॉरवर्ड करण्यात आलेली फाईल्सला फिल्टर करण्यासाठी Storage Usage सेक्शन मध्ये एक Forwarded फाईल्स ऑप्स दिले जाईल. तसेच नवीन ऑप्शनमध्ये Newest, Oldest आणि Size हिशोबाप्रमाणे मॅनेज केले जाऊ शकत होते.

व्हॉट्सअॅपमध्ये एक अपग्रेडेड डिलीट मेसेजवरही काम केले जात आहे. या फीचरमुळे युजर्संना खूप सारे मेसेज डिलीट करावे लागणार नाही. WABetaInfo द्वारा शेअर करण्यात आलेल्या एका स्क्रीनशॉटच्या माहितीनुसार Delete all except starred ऑप्शन मिळणार आहे. तसेच सध्याच्या Delete all हे ऑप्शन सुद्धा कायम ठेवण्यात येणार आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला ग्रुपमधील मेसेज डिलिट करावे लागणार नाहीत. यात एक वेळ सेट केली की, ग्रुपमधील मेसेज आपोआप डिलीट होतील.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here