Renuka Deshmukh | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 30, 2022, 10:59 AM

VI Users: सायबर सुरक्षा फर्म CyberX9 च्या अहवालानुसार, Vi ने कॉल रेकॉर्ड, एसएमएस तपशील, इंटरनेट वापर तपशील, स्थान, पूर्ण नाव, फोन नंबर, पत्ता, पर्यायी संपर्क क्रमांक, युजर्सचे बिल तपशील यासारखे तपशील लीक केले आहेत.

 

vi users
नवी दिल्ली:Data Leak: Vodafone-Idea युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी CyberX9 ने दावा केला आहे की, Vi ने आपल्या यूजर्सचा डेटा लीक केला असून यामध्ये २० दशलक्षाहून अधिक पोस्टपेड युजर्सचा डेटा समाविष्ट आहे. सर्व पोस्टपेड युजर्ससह सुमारे ३०१ दशलक्ष ग्राहकांचे फोन नंबर, पत्ते, कॉल लॉग, एसएमएस रेकॉर्ड आणि मोबाइल इंटरनेट वापराचे तपशील ऑनलाइन लीक झाले आहेत. व्होडाफोन आयडियाने नंतर डेटा उल्लंघन केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच, कथितपणे टेलिकॉम कंपनीला याची माहिती मिळताच हे प्रकरण तात्काळ दुरुस्त करण्यात आल्याचा दावाही केला आहे.

वाचा: 5G Services In India: ‘या’ शहरांसाठी दिवाळी असेल खास, सर्वप्रथम 5G सेवा मिळणार, पाहा लिस्ट

सायबर सुरक्षा फर्म CyberX9 च्या अहवालानुसार, Vi ने कॉल रेकॉर्ड, एसएमएस तपशील, इंटरनेट वापर तपशील, स्थान, पूर्ण नाव, फोन नंबर, पत्ता, पर्यायी संपर्क क्रमांक, वापरकर्त्यांचे बिल तपशील यासारखे तपशील उघड केले आहेत. यामध्ये ३०१ दशलक्षाहून अधिक युजर्सचा डेटा समाविष्ट आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, लीक झालेल्या डेटामध्ये पोस्टपेड यूजर्सचा समावेश आहे. यामध्ये पोस्टपेड सेवेचे सदस्यत्व घेतलेल्या २० दशलक्ष ग्राहकांच्या नोंदींचा समावेश आहे. कथितपणे समोर आलेल्या कॉल डेटामध्ये वैयक्तिक तपशीलांचा समावेश आहे. यामध्ये Vi ग्राहकाचा फोन नंबर आणि पर्यायी संपर्क क्रमांक, पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तपशील समाविष्ट आहेत.

वाचा: Reliance Jio ची मोठी घोषणा, दिवाळीपर्यंत मुंबई, दिल्लीसह ‘या’ शहरांना मिळणार 5G नेटवर्क , पाहा डिटेल्स

“यामुळे Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमचे नुकसान होईल असे CyberX9 ने म्हटले आहे. कंपनीने व्होडाफोन आयडियावर गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांच्या संवेदनशील डेटाचा पर्दाफाश केल्याचा आरोप केला असून, लीक झालेला डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे. अद्याप Vi कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

वाचा: Upcoming Smartphones:स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, सप्टेंबरमध्ये iphone 14सह धुमाकूळ घालायला येताहेत हे फोन्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here