Baban Bansidhar Lihinar | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 30, 2022, 1:50 PM

Apple iPhone 12 Discount: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर Apple iPhone 12 ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तुम्हाला जर आयफोन १२ खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. आयफोन १२ ला फ्लिपकार्टवरून ४५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

 

iphone 12

हायलाइट्स:

  • आयफोन १२ स्वस्तात खरेदी करा
  • आयफोन १४ च्या लाँचिंगआधी सूट
  • कमी किंमतीत आयफोन खरेदीची संधी
नवी दिल्लीः Apple iPhone 14 च्या लाँचिंग वरून दररोज नवीन नवीन बातम्या येत आहेत. आयफोन १४ सीरीजला पुढील महिन्यात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या जुन्या आयफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकते. आयफोन वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सध्या आयफोन १२ वर कंपनी बंपर डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर दिला जात आहे. आयफोन १२ च्या बेस व्हेरियंटला ६५ हजार ९०० रुपयाच्या जागी ५९ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. बेस व्हेरियंट मध्ये ६४ जीबीची इंटरनल मेमरी दिली जाते. याशिवाय, कंपनी यावर अनेक बँक ऑफर्स देत आहे.

फ्लिपकार्टच्या या फोनला एसबीआयच्या मास्टर डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास २५० रुपयाची सूट दिली जात आहे. याशिवाय, २०५१ रुपये प्रति महिना ईएमआय ऑप्शन सुद्धा कंपनी देत आहे. परंतु, आणखी एका डील द्वारे या फोनला तुम्ही ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात.

एक्सचेंज ऑफर

या ठिकाणी एक्सचेंज ऑफरमध्ये म्हणजेच जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १७ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. तुम्हाला जर एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास आयफोन १२ ला ५९ हजार ९९९ रुपयाच्या जागी ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. एक्सचेंज व्हॅल्यू पूर्णपणे फोनच्या कंडिशन आणि मॉडलवर अवलंबून आहे. या फोनच्या दुसऱ्या स्टोरेज व्हेरियंट्सला कमी किंमती खरेदी करता येवू शकते. फ्लिपकार्टवर आयफोन १२ च्या १२८ जीबी मॉडलला ६४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर २५६ जीबी स्टोरेजच्या मॉडलला सुद्धा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः 64MP कॅमेरा आणि 44W चार्जिंग सोबत Vivo चा पॉवरफुल स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

वाचाः Top 5G Phones: 5G स्मार्टफोनवर स्विच करायचेय? पाहा ही लिस्ट, फोन्सची किंमत २० हजारांपेक्षाही कमी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here