नवी दिल्लीः ओप्पोने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनला कंपनीने ए सीरिज अंतर्गत आणले आहे. हा स्मार्टफोन आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे दिले आहेत. फोनमध्ये बॅकला ४ कॅमेरे दिले आहे. तर फ्रंटला होल पंच कटआऊट मध्ये सिंगल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते.

वाचाः

स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर
सध्या सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये आहे. ओप्पोचा हा फोन ट्वाईलाईट ब्लॅक आणि स्ट्रीम व्हाईट या दोन कलरमध्ये आहे. सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेलर्सकडे या फोनची विक्री १७ जून पासून सुरू होणार आहे. ग्राहकांना हा फोन नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआय या ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.

इंट्रोडक्टरी ऑफर्स अंतर्गत बँक ऑफर बडोदा च्या क्रेडिट कार्ट आणि फेडरल बँकेच्या डेबिट कार्डवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. भारतात हा फोन ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये तसेच ८ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध करण्यात येईल, असा कंपनीने दावा केला आहे.

वाचाः

फोनची खास वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर बेस्ड ColourOS 7.1 चालतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा स्क्रीन दिली आहे. या फोनचा स्क्रीन टू स्क्रीन ९०.५ टक्के आहे. ओप्पोचा हा फोन ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो.

फोनच्या बॅकला क्वॉड कॅमेरा दिला आहे. यात ४ मागे ४ कॅमेरे लावलेले आहेत. फोनच्या बॅकला १२ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा दोन कॅमेरे सेन्सर दिले आहे. सेल्फीसाठी व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here