केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जीएसटीच्या दरात १२ टक्क्यांवरून १८ टक्के अशी दरवाढ केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोबाइल कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. या यादीत चीनची कंपनी शाओमी पासून रियलमी आणि सॅमसंग पर्यंत या सर्व स्मार्टफोनचा समावेश होता. जीएसटी दरवाढीने आधीच महागलेल्या मोबाइलच्या किंमतीत लॉकडाऊनची भर पडली. देशात चौथा टप्प्यात लॉकडाऊन सुरू आहे. ३० जून पर्यंत लॉकडाऊन सुरू असून करोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना संसर्ग झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारत आता जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार की आणखी वाढेल, हे ३० जून नंतर स्पष्ट होईल. परंतु, लॉकडाऊन आणि जीएसटीमुळे मोबाइलच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे मात्र नक्की. पाहुयात कोणत्या फोनची किंमत किती वाढलीय….

पोकोच्या या पॉवरफुल स्मार्टफोनची किंमत गेल्या आठवड्यात वाढवण्यात आली आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज फोनच्या खरेदीसाठी आता १६ हजार ९९९ रुपयांऐवजी आता १७ हजार ४९९ रुपये मोजावे लागतील. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपयांऐवजी आता ही किंमत १८ हजार ४९९ रुपये झाली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या मॉडलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम २१ या स्मार्टफोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सॅमसंगचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी करायचा असल्यास यासाठी आता १३ हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहे. या फोनला १३ हजार ४९९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. आता या फोनची किंमत ५०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मॉडेलच्या फोनसाठी १५ हजार ४९९ रुपयांऐवजी आता १५ हजार ९९९ रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

चीनची कंपनी शाओमीचा रेडमी नोट ८ ची किंमत आता ११ हजार ४९९ रुपया ऐवजी आता ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. ही किंमत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मॉडलची आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १३ हजार रुपये वाढून ती आता १४ हजार ४९९ रुपये झाली आहे. रेडमीच्या फोनच्या किंमतीत २ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शाओमीच्या रेडमी नोट ८ सीरिजला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, या फोनची किंमत आता वाढली आहे.

चीनची कंपनी शाओमीचा रेडमी ८ सीरिज भारतात खूप प्रसिद्ध आहे. रेडमी ८ चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ९ हजार २९९ रुपये ऐवजी आता ९ हजार ४९९ रुपये झाली आहे. या फोनच्या ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या बेस मॉडलसोबत बाजारात उतरवण्यात आले होते. या फोनची किंमत त्यावेळी ७ हजार ९९९ रुपये होती. परंतु, कंपनीने आता हे मॉडल बनवणे बंद केले आहे. रेडमी ९ सीरिज नंतर आता कंपनीने रेडमी ९ आणि १० सीरिज उतरवली आहे. रेडमी सीरिजला भारतात खूप प्रतिसाद मिळतोय.

भारताच्या मोबाइल मार्केटमध्ये सध्या चीनच्या मोबाइलचा दबदबा पाहायला मिळतो. रेडमी Redmi 8A Dual २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट आता ७ हजार ४९९ रुपयांत मिळतोय. तर या आधी या फोनची किंमत ७ हजार २९९ रुपये होती. दरम्यान, ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आधी इतकीच म्हणजेच ७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ स्टोरेजच्या मॉडलची किंमत ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. डिव्हाईसला फेब्रुवारी नंतर १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

चीनची आणखी एक कंपनी रियलमीने आपला स्मार्टफोन ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोनची किंमत वाढ केली आहे. Realme C3 या फोनची किंमत आधी ७ हजार ४९९ रुपये होती. परंतु, आता या फोनसाठी ग्राहकांना ७ हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. या आधी या फोनला ६ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात जीएसटी दर वाढवल्याने या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा या फोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here