नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आणखी एक नवीन फोन आणण्याची तयारी करीत आहे. हा कंपनीचा गॅलेक्सी M31 चे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. या फोनचे नाव असू शकते गॅलेक्सी M31s. नुकताच हा स्मार्टफोन गीकबेंचच्या वेबसाईटवर दिसला आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी A31 स्मार्टफोन लाँच केला होता. याची किंमत २१ हजार ९९९ रुपये होती.

वाचाः

असे असणार चे फीचर्स
रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंगच्या या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळू शकतो. गीकबेंच वरुन हेही माहिती पडले की, हा फोन अँड्रॉयड १० वर काम करेन. तसेच यात सॅमसंगचा One UI यूजर इंटरफेस मिळेल. गीकबेंच स्कोरच्या माहितीनुसार, फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये ३४७ आणि मल्टि टेस्टमध्ये १२५६ पॉइंट्स मिळाले.

वाचाः

गॅलेक्सी एम३१ प्रमाणे या स्मार्टफोनमध्येही अमोलेड डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळू शकतो. रिपोर्टनुसार, यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा कॅमेरा आणि 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. यात यूएसबी टाईप सी पोर्ट मिळणार आहे.

कसा होता Galaxy M31
या स्मार्टफोनला याच वर्षी फेब्रुवारीत लाँच करण्यात आले होते. या फोनमध्ये ६.४० इंचाचा डिस्प्ले, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला होता. यात 64MP + 8MP + 5MP + 5MP रियर कॅमेऱ्याचा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दिली होती. या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here