Top Smartphones Under 15,000: जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी म्हणजे अगदी १५,००० रुपयांपर्यंत असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला अशा टॉप ५ स्मार्टफोन्सची माहिती देत आहो. जे ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या यादीमध्ये Samsung Galaxy M13, Redmi 9 Active, realme narzo 50A Prime, iQOO Z6 आणि Redmi 9A Sport यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्सची किंमत कमी असली तरी यामध्ये देण्यात आलेले फीचर्स एकापेक्षा आहेत. तसेच, हे स्मार्टफोन्स तुम्ही मित्र- कुटुंबियांना भेट म्हणून देखील देऊ शकता. पाहा स्वस्तात मस्त टॉप ५ स्मार्टफोन्सची ही लिस्ट आणि खरेदी करा या टॉप स्मार्टफोन्सपैकी एक बेस्ट स्मार्टफोन .

Redmi 9A Sport

redmi-9a-sport

Redmi 9A Sport: Redmi 9A Sport ची सुरुवातीची किंमत ६९९९ रुपये आहे. यात 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. यात MediaTek Helio G25 प्रोसेसर आहे. तसेच ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात १३ MP AI कॅमेरा आहे. त्याचबरोबर 5MP AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 9 Sport फोनमध्ये जाड बेझल देण्यात आले आहेत. : Redmi 9A Sport मध्ये तुम्हाला ५१२ GB पर्यंत microSD कार्ड सपोर्ट मिळेल. पॉवरसाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा: OMG ! ही कंपनी पैशांसाठी हॅक करते Android-iOS डिव्हाइसेस, हॅकिंगसाठी आकारते ‘इतके’ कोटी, पाहा डिटेल्स

Redmi 9 Activ

redmi-9-activ

Redmi 9 Activ: यात ऑक्टा-कोर Helio G35 प्रोसेसर आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर १३ मेगापिक्सेल आणि दुसरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यात ५००० mAH बॅटरी आहे. तसेच 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्याची किंमत ८९९९ रुपये आहे. कमी किमतीत जबरदस्त फीचर्स ऑफर करणारा Redmi 9 Activ बजेट बायरसाठी एक चांगला पर्याय आहे.

वाचा: युजर्सची मनं जिंकायला येतोय Redmi 11 Prime 5G, स्टायलिश डिझाईनसह मिळणार A1 फीचर्स

​Samsung Galaxy M13

samsung-galaxy-m13

Samsung Galaxy M13: यात 6 GB पर्यंत RAM आहे. यात 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. तसेच, ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात Android 12, ६.६ -इंचाचा FHD + Infinity-O डिस्प्लेसह ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५० एमपीचा ट्रिपल कॅमेरा आहे. त्याचा दुसरा सेन्सर ५ मेगापिक्सल्सचा आणि तिसरा २ मेगापिक्सल्सचा आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे अतिशय स्टाइलिश डिझाइनसह येते. यात 2 वर्षांची OS अपडेट्स आणि ४ वर्षांची सुरक्षा अपडेट्स देण्यात आली आहेत. त्याच वेळी, यामध्ये फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे. त्याची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते.

वाचा: Jio-Airtel-Vi-BSNL सुद्धा ‘या’ प्लानसमोर फेल ! ४९ रुपयांत १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह बरंच काही

iQOO Z6

iqoo-z6

iQOO Z6: त्याची किंमत १४,४९९ रुपयांपासून सुरू होते. यात ६.४४ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8 GB पर्यंत रॅम आहे. तसेच 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे. हे Android 12 वर काम करते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे. दुसरा २-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. त्याच वेळी, एक २ मेगापिक्सेल बोकेह सेन्सर आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

वाचा: OnePlus Nord Wired इयरफोनचा पहिला सेल आज, १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार

Realme Narzo 50 a Prime

realme-narzo-50-a-prime

realme-narzo-50a-prime: यात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. यात ६.६ -इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यात एलसीडी, सेल्युलर तंत्रज्ञान डिस्प्ले प्रकार देखील आहे. तसेच ५० MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, यात ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याच वेळी, ५००० mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे जी १८ W द्रुत चार्जिंगला समर्थन देते. यात Unisoc T612 प्रोसेसर आहे. हे Android 11 वर काम करते. त्याची सुरुवातीची किंमत ११,४९९ रुपये आहे.

वाचा: आता घर बसल्या मिळेल DL, Aadhaar Card, Voter ID, PAN Card, फॉलो करा सोप्या स्टेप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here