4000gb broadband plan : भारतातील शहरा प्रमाणेच आता ग्रामीण भागात सुद्धा हाय स्पीड इंटरनेटची डिमांड खूप वाढली आहे. करोना काळात ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम केले जात असत. त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी अजूनही वर्क फ्रॉम होम केले जात आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसंतीचे शो आणि मूव्ही पाहण्यासाठी अनेकांना हाय स्पीड इंटरनेटची गरज आहे. सध्या इंडियन मार्केटमध्ये 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीडचे प्लान उपलब्ध आहेत. परंतु, याची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी टाटा प्ले फायबर, जिओ फायबर, एअरटेल Xstream फाइबर आणि बीएसएनएल भारत फाइबरचे 300Mbps चे काही जबरदस्त प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. हे प्लान 1Gbps स्पीडचे प्लान थोडे स्वस्त आहेत. यात 4000GB पर्यंत डेटा सोबत अनेक शानदार ओटीटी बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहे.

​जिओ फायबरचा 300Mbps चा प्लान

-300mbps-

जिओच्या या प्लानची किंमत १४९९ रुपये आहे. यात 300Mbps ची स्पीडने एकूण 3300जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग बेनिफिट सुद्धा मिळेल. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ओटीटी बेनिफिट्स मिळते. प्लानमध्ये कंपनी १५ हून जास्त ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. यात नेटफ्लिक्स बेसिक, डिज्नी+ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी लिव आणि वट सेलेक्ट शिवाय, अनेक पॉप्यूलर अॅपचा समावेश आहे.

वाचा :फक्त ६,२०० रुपयांत घरी येईल ‘हा’ Redmi स्मार्टफोन, फोनमध्ये मजबूत बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, पाहा ऑफर

​एअरटेल Xstream फाइबरचा 300Mbpsचा प्लान

-xstream-300mbps-

एअरटेलच्या प्लानसाठी तुम्हाला दर महिना १४९९ रुपये खर्च करावे लागतील. प्लानमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी दर महिना ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी डेटा देत आहे. या प्लान सोबत तुम्हाला एक लँडलाइन कनेक्शन सुद्धा मिळेल. प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जात आहे.

वाचाः अर्ध्यापेक्षा वीजबील कमी येणार, घरात बसवा या 1.5 Ton Window AC

​टाटा प्ले फायबर 300Mbps चा प्लान

-300mbps-

टाटा प्ले फायबरचा हा प्लान १५०० रुपयाचा आहे. एक महिन्याच्या या प्लानमध्ये तुम्हाला 300Mbps ची इंटरनेट स्पीड मिळेल. प्लानमध्ये तुम्हाला कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी ३३०० जीबी डेटा ऑफर करीत आहे. या प्लान सोबत कंपनी एक फ्री लँडलाइन कनेक्शन सुद्धा देत आहे. टाटा प्ले फायबरच्या या प्लानला जर वर्षभरासाठी सब्सक्राइब करीत असाल तर तुम्हाला २४०० रुपयाचा फायदा होईल.

वाचाः WhatsApp, Facebook आणि Instagram साठी पैसे मोजावे लागणार, कंपनी करतेय यावर काम, पाहा डिटेल्स

​बीएसएनएलचा भारत फायबरचा 300 Mbps चा प्लान

-300-mbps-

बीएसएनएलच्या या प्लानची किंमत १४९९ रुपये आहे. या प्लान मध्ये कंपनी ४०० जीबी (4TB) डेटा ऑफर करीत आहे. बीएसएनएलच्या या प्लान सोबत सब्सक्राइबर्सला फ्री मध्ये एक लँडलाइन कनेक्शन सुद्धा देत आहे. या शिवाय, कंपनी या प्लानमध्ये यूजर्संना फ्री मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर करीत आहे.

वाचाः नवीन लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा, होणार फायदा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

106 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here