नवी दिल्लीः टेक कंपनी वनप्लसची लेटेस्ट सीरिज खरेदी करण्यासाठी युजर्संना मोठी वाट पाहावी लागली. सीरिजच्या हाय अँड डिव्हाईस चा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित करण्यात आला आहे. OnePlus 8 Proचा अधिकृत लाँचिंगनंतरचाहा हा आज पहिला सेल होत आहे. या स्मार्टफोनला शॉपिंग साईट अॅमेझॉन आणि वनप्लसची अधिकृत साईटवरून खरेदी करता येवू शकणार आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल २९ मे रोजी होणार होता. परंतु, लॉकडाऊन असल्याने हा सेल पुढे ढकलण्यात आला होता.

वाचाः

वनप्लसकडून सांगण्यात आले आहे की, फ्लॅगशीप फोनचे लिमिटेड युनिट्स देशात मोठी डिमांड असल्याने या सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत. OnePlus 8 Pro ला OnePlus 8 सोबत एप्रिल मध्ये लाँच करण्यात आले होते.स्टँडर्ड OnePlus 8 ची सेल दोन वेळेस ऑनलाइन झालेली आहे. तर OnePlus 8 Pro सुरुवातीला प्रोडक्शन आणि सप्लाय संबंधीत काही अडचण आल्याने आतापर्यंत मार्केटमध्ये उतरवण्यात आले नव्हते.

वाचाः

किंमत आणि सेल ऑफर्स
भारतात OnePlus 8 Pro चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला ग्लेशियल ग्रीन, ऑनेक्स ब्लॅक, आणि अल्ट्रामरीन ब्लू कलर या पर्यायात उतरवण्यात आले आहे.

सेल ऑफर्समध्ये OnePlus 8 Pro खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कार्ड युजर्संना ३ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनचा पर्याय मिळत आहे. तसेच जिओकडून ६ हजार रुपये किंमतीचे बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. याला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी केले जावू शकते.

OnePlus 8 Pro चे खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. लेटेस्ट क्वॉलकॉम स्न्रॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये रियर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ४८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा कलर फिल्टर लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. अँड्रॉयड १० बेस्ड OxygenOS वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4510mAh ची बॅटरी दिली आहे. ३० टी वॉर्प चार्ज सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here