Best Smartphones: गेल्या महिन्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. शिवाय काही दिवसात देशात 5G देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशात जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 5G स्मार्टफोन खरेदी करणे चांगले होईल. जेणेकरून तुम्हाला 5G सेवेचा लाभ घेता येईल. कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा याबाबत जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर, आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासोबत काह भन्नाट स्मार्टफोन्सची लिस्ट शेयर करणार आहो . विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी, ६ GB रॅम आणि ६४ MP कॅमेरा यांचा समावेश आहे आणि या स्मार्टफोन्सची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. लिस्टमध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G, Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G, Realme 9 Pro, Samsung Galaxy M52 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Poco X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

POCO X4 Pro: किंमत – १८,९९९ रुपये

POCO X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा स्क्रीन रिफ्रेश दर १२० Hz आहे. टच सॅम्पलिंग रेट ३६० Hz आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ MP आहे. याशिवाय, ८ MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ MP मॅक्रो लेन्स समर्थित आहेत. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला ६७ W MMT Sonic चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोन चिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट सपोर्टवर ६ nm सिस्टमसह येईल.

वाचा: TV, Laptop आणि Mobile जबरदस्त स्पीडमध्ये करणार काम, पाहा ५०० रुपयांत येणारे ‘हे’ ब्रॉडबँड प्लान्स

Realme 9 Pro

realme-9-pro

Realme 9 Pro: किंमत – १८,७०० रुपये

Realme 9 Pro + 5G स्मार्टफोन Android 12 आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. फोनमध्ये ६.४ -इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोन ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 920 SoC चिपसेट समर्थित आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सपोर्ट असेल. फोनला ८-मेगापिक्सलचा सेन्सर आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला १६-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा: Aadhar Card सोबत कॅरी करण्याची नाही गरज, फोनमध्येच ‘असे’ करा डाउनलोड, फॉलो करा ही प्रोसेस

​Samsung Galaxy M52 5G

samsung-galaxy-m52-5g

Samsung Galaxy M52 5G: किंमत – १९,९९९ रुपये

Samsung Galaxy M52 5G फोनमध्ये ६.७ -इंचाचा FHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. फोनला १२० HZ चा रिफ्रेश दर देखील मिळतो. फोनमध्ये Snapdragon 778G प्रोसेसर बसवण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ MP आहे. याशिवाय, १२ MP कॅमेरा आणि ५ MP सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे. यासोबतच यामध्ये २५ W चे फास्ट चार्जिंगचे फीचर देखील उपलब्ध आहे.

वाचा : मस्तच ! १० हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy F12, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह मजबूत बॅटरी

​OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G: किंमत : १८,९९९ रुपये

OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये ६.५९ -इंच फुल-एचडी + डिस्प्ले, १२० Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. तसेच, २४० Hz टच रिस्पॉन्स रेट उपलब्ध आहे. फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ६४-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सेल शूटर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, फोनमध्ये १६-मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर आहे. याशिवाय, फोनमध्ये ३३ W SuperVOOC वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे.

Redmi Note 11 Pro plus 5G

redmi-note-11-pro-plus-5g

Redmi Note 11 Pro Plus 5G , किंमत – २०,९९९ रुपये

Redmi Note 11 Pro + 5G स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. टच सॅम्पलिंग रेट ३६० Hz आहे. फोन ६ nm आधारित ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ सपोर्टसह येतो. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा २०८ मेगापिक्सेल असेल. याशिवाय, ८ -मेगापिक्सलचा ११८-डिग्री अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. फोनमध्ये तिसरा कॅमेरा म्हणून २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये १६ -मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये मोठी ५००० mAh बॅटरी असेल. ज्याला ६७ W टर्बो फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचा:Smartphone Heating: मोबाइल फोन सतत गरम होत असेल तर, चुकूनही करू नका ‘हे’ ५ काम, मोठे नुकसान होणार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here