नवी दिल्लीः रेडमीचा जबरदस्त स्मार्टफोन आज सेलमध्ये खरेदी करता येऊ शकतो. या सेलला आज दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. युजर्स अॅमेझॉन इंडिया आणि शाओमीची अधिकृत वेबसाईट वरून हा फोन खरेदी करु शकतो. भारतात मार्च महिन्यात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर हा फोन आताही केवळ फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे.

वाचाः

या ऑफर्स मिळणार
रेडमी नोट प्रोचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. आजच्या या सेलमध्ये फोन खरेदी करण्यावर काही ऑफर्स मिळू शकतात. एअरटेल युजर्संना हा फोन खरेदी करण्यावर डबल डेटा बेनिफिट् ऑफर आहे. डबल डेटा बेनिफिट २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या रिचार्जवर मिळेल. कोविड-१९मुळे कंपनी सध्या एमआय एक्सचेंज ऑफर करीत नाही.

वाचाः

रेडमी नोट ९ प्रोचे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोटेक्शनसाठी ग्लास ५ दिला आहे. ६ जीबी पर्यंत LPDD4X रॅमच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020 mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here