Poco F4

Poco F4: Poco F4 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 GB रॅम उपलब्ध आहे. पण, 12 जीबी रॅम सह व्हेरिएंट 256 जीबी स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर,६.६७ इंच १२० Hz AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी ६७ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची किंमत ३३,९९९ रुपयांपासून सुरू होते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह कनेक्टिव्हिटीसाठी ५G, ४G LTE, Wi-Fi ८०२.११ac, Bluetooth v५.२, GPS/ A-GPS/ NavIC, NFC आणि एक USB Type-C पोर्ट दिला आहे.
वाचा: आता Aadhaar-DL-PAN Card हरविण्याचे किंवा खराब होण्याचे नाही टेन्शन ! ‘असे’ करा ऑनलाइन सेव्ह
Samsung Galaxy Z Fold 4

Samsung Galaxy Z Fold 4: Samsung Galaxy Z Fold 4 हा फोल्ड करण्यायोग्य श्रेणीतील कंपनीचा नवीन फोन आहे. या हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.२ -इंचाचा बाह्य डिस्प्ले आणि ७.६ इंचाचा अंतर्गत डिस्प्ले आहे. Galaxy Z Fold 4 ची किंमत १,५४,९९९ रुपयांपासून सुरू होते. Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन दोन डिस्प्लेसह येतो. याची मुख्य स्क्रीन ६.७ इंच AMOLED पॅनेल आहे, जी Full HD+ रिझॉल्यूशन आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते.
OnePlus 10T

OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच, OnePlus 10T मध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७ -इंचाची फ्लुइड AMOLED स्क्रीन आहे. फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 सह येतो. या स्मार्टफोनमध्ये ४८०० mAh बॅटरी आहे. जी १५० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus 10T च्या बेस व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन अवघ्या १९ मिनिटात फुल चार्ज होतो. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
वाचा: Smartphone offers: ब्रँडेड स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी गमावू नका, Amazon सेलचा आज शेवटचा दिवस
Vivo X80 Pro

Vivo X80 Pro: स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ४७०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी ८० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची किंमत ७९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED आहे. जो 2K रिझोल्यूशन ऑफर करतो आणि १२० Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, ५० मेगापिक्सेल Samsung ISOCELL GNV प्रायमरी कॅमेरा सेन्सर, ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सोनी IMX598 कॅमेरा सेन्सर, १२ मेगापिक्सेल सोनी IMX663 कॅमेरा सेन्सर आणि ८ मेगापिक्सेल पेरिस्कोप आकाराचा अल्ट्रा-टेलिफोटो लेन्स फोनच्या मागील बाजूस देण्यात आला आहे.
Samsung Galaxy S22 Ultra

Samsung Galaxy S22 Ultra: Samsung Galaxy S22 Ultra हे सॅमसंगच्या सर्वोत्तम फ्लॅगशिप उपकरणांपैकी एक आहे. Galaxy S22 Ultra मध्ये ६.८ -इंचाचा QHD + AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोन १,१८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. १२ जीबी रॅमची आवश्यकता असल्यास तुम्ही Samsung Galaxy S22 Ultra चा नक्कीच विचार करू शकता. यातील इतर फीचर्स देखील भन्नाट आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times