वाचाः
८०५ रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन जा टीव्ही
या स्मार्ट टीव्ही वर नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. फ्रेम २०२० मॉडल तुम्ही २४ महिन्यांसाठी ३१२५ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करु शकता. तर ऑनलाइन स्मार्ट टीव्ही रेंज ८०५ रुपयांच्या प्रति महिन्याच्या ईएमआयवर खरेदी करु शकता. या ईएमआयचा कालावधी १८ महिन्याचा आहे.
१५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार
सॅमसंगने घोषणा केली आहे की, आधी ४८ तासात जे ग्राहक क्रेडिट कार्डवरून प्री पेड ऑर्डर प्लेस करतील त्यांना १५०० रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. तर अॅमेझॉन एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना ऑर्डर प्लेस केल्यानंतर तात्काळ १००० रुपयांचा डिस्काउंट देणार आहे.
वाचाः
सॅमसंग फ्रेम २०२०२ ची किंमत
सॅमसंग फ्रेम २०२० टीव्ही ५० इंच, ५५ इंच, ६५ इंचाचा डिस्प्ले साईज मध्ये उपलब्ध आहे. याची किंमत अनुक्रमे ७४,९९० रुपये, ८४,९९० रुपये आणि १३९,९९० रुपये आहे.
१० वर्षांची वॉरंटी मिळणार
सॅमसंगच्या फ्रेम २०२० टीव्हीवर कंपनी १० वर्षाची नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी देत आहे. तसेच १ वर्षाची कॉम्प्रिहेन्सिंव वॉरंटी आणि एका वर्षाची अतिरिक्त वॉरंटी पॅनेलसाठी देत आहे.
सॅमसंग ऑनलाइन स्मार्ट टीव्ही रेंजची किंमत
Samsung 4K UHD च्या ४३ इंचाचा डिस्प्लेच्या मॉडलची किंमत ३६ हजार ९९० रुपये आहे. तर ६५ इंचाच्या मॉडलची किंमत ८९,९९० रुपये आहे. तसेच FHD आणि HD रेडी स्मार्ट TV ची किंमत १४ हजार ९९० रुपये आणि ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत ३१ हजार ९९० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times