Amazon Sale On Redmi 11 Prime : Redmi या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीने नुकताच एक स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केला आहे. Redmi 11 Prime असं या स्मार्टफोनचं नाव असून याची किंमत साधारण 12,999 रूपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनमधील दुसरे मॉडेल Redmi 11 Prime 5G आहे. हा स्मार्टफोन ग्रीन, पर्पल आणि ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 9 सप्टेंबरपासून Amazon वर उपलब्ध होतील. या स्मार्टफोनमध्ये आणखी कोणते फिचर्स आहेत ते जाणून घ्या.     

Redmi 11 Prime चे स्पेसिफिकेशन्स : 

  • या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट आहेत. ज्यात 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन आणि त्याची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते.
  • दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज आहे आणि त्याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. फोनची रॅम बूस्टरने 8GB पर्यंत वाढवता येते. Redmi 11 प्राईम स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्कसह व्हर्जन देखील आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे, दुसरा मॅक्रो कॅमेरा आणि तिसरा डेप्थ कॅमेरा आहे.
  • स्मार्टफोनमधील सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये मूव्ही फ्रेम, शॉर्ट व्हिडिओ, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, लँडस्केप आणि नाईट व्हिजन वैशिष्ट्ये आहेत.
  • स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच अॅडाप्टिव्ह सिंक FHD डिस्प्लेसह मोठी स्क्रीन आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या मजबुतीसाठी गोरिला ग्लास संरक्षण आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे आणि 22W जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करते. स्मार्टफोनची बॅटरी 30 दिवस टिकू शकते.
  • या स्मार्टफोनवरून तुम्ही ४५ तासांपेक्षा जास्त काळ सतत कॉल करू शकता. स्मार्टफोनच्या बॅटरीमधून तुम्ही 150 तास सतत संगीत ऐकू शकता.
  • स्मार्टफोनमध्ये Fast Media Tech Helio G99 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये दोन 4G सिमचा ऑप्शन आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दोन 5G नेटवर्क सिम उपलब्ध आहेत.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here