नवी दिल्लीः चिनी मोबाइल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपन्या या भारतात एक वाढत असलेले मार्केट आहे. पासून पर्यंत आणि हेलो अॅप पर्यंत हे सर्व चायनीज अॅप्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. या अॅप्सचा वापर इतका भयानक सिद्ध होऊ शकतो की, तुम्ही त्याचा विचार करु शकत नाही. काही रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे की, धोकादायक असतात. त्यांच्यामुळे काय नुकसान होऊ शकते, जाणून घ्या.

वाचाः

गरज नसलेले अॅक्सेस मागितले जाते
एका इनफॉर्मेशन सिक्योरिटी फर्मच्या स्टडीत म्हटले की, Helo, Shareit आणि UC ब्राउझर यासारख्या १० पैकी ६ प्रसिद्ध चायनीज अॅप्स युजर्संना कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अॅक्सेस मागतात. परंतु, या अॅप्समध्ये या सारख्या अॅक्सेसचे कोणतेही काम नसते. पुण्याच्या Arrka Consulting चे सह संस्थापक संदीप रावने म्हटले की, हे जगभरातील टॉप ५० अॅप्सकडून मागितलेल्या परमिनशनपेक्षा ४५ टक्के जास्त आहे.

अधिक चायनीज अॅप्स लोकेशनचा अॅक्सेस मागते. rrka Consulting च्या सह संस्थापक शिवांगी नाडकर्णी यांच्या माहितीनुसार, यूसी ब्राऊझर लोकेशनचा अॅक्सेस मागते. ही व्यक्ती कुठून माहिती सर्च करतेय, याची माहिती मिळवता यावी यासाठी हा कंपनीचा खटाटोप आहे. यासारखे अॅक्सेस हा फूड डिलिव्हरी देणाऱ्या अॅप्ससाठी गरजेचा आहे. यूसी ब्राऊझरला हे कशासाठी हवे आहे?

वाचाः

कोणता अॅप पाठवतो डेटा
स्टडीमध्ये हेही उघड झाले आहे की, अॅप्स युजर्संचा डेटा सात विदेशी एजन्सीला ट्रान्सफर करते. यात म्हटले की, ६९ टक्के यूएस ट्रान्सफर केला जातो. रिपोर्टनुसार, टिकटॉक आपला डेटा चायना टेलिकॉमला पाठवतो. तर विगो व्हिडिओ आपला डेटा Tencent, ब्यूटीप्लस आपला डेटा Meitu आणि QQ व UC ब्राउजरला डेटा आपली पॅंरंट कंपनी Alibaba पर्यंत पोहोचवतो.

हेरगिरीचाही आरोप
चायनीज अॅप्सवर हेरगिरी आणि धोका करीत असल्याचा आरोग करण्यात आलेले आहेत. २०१७ मध्ये भारतीय इंटेलिजन्स एजन्सी ने असा ४२ मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जो चायनीज डेव्हलपर्सने तयार केलेला आहे. किंवा चीन संबंधी त्यात लिंक आहे. हा इशारा भारतीय लष्कर आणि अर्ध सैनिक दल यांच्यासाठी जारी केला होता. त्यावेळी म्हटले होते की, हे अॅप्स सायबर अटॅक करण्याची क्षमता ठेवतात.

वाचाः

बँक अकाउंट होऊ शकते रिकामे
नुकतेच Upstream च्या एका रिपोर्टमध्ये प्रसिद्ध चायनीज अॅप Snaptube वर युजर्संची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. यात म्हटले की, विना परमिशन युजर्संना प्रीमियम सर्विससाठी साइन अप करण्यात येते. तसेच जाहाराती डाऊनलोड आणि क्लिक सुद्धा केले जाते. रिपोर्टच्या माहितीनुसार गेल्या वर्षी ७ कोटीहून अधिक फ्रॉड ट्रान्झॅक्शन स्नॅपट्यूब कडून करण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here