नवी दिल्लीःiPhone 14 Memes and Jokes : Apple ने बुधवारी आपली बहुप्रतीक्षित iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. रात्री आयफोन सीरीज अंतर्गत कंपनीने चार आयफोन लाँच करीत असल्याची घोषणा केल्यानंतर चाहते, ऑनलाइन नेटिजन्सने सर्वात आधी ट्विटरवर मजेदार मिम्स बनवले व ते मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. लाँचिंग नंतर तात्काळा आयफोन १४ हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात झाली आहे. आयफोनची किंमत उघड होताच किडनी जोक्स सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्विटरवर दिसायला लागले. या मिम्सला अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. iPhone 14 Memes पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू उमटेल. पाहा डिटेल्स.

वाचाः भारतात ‘या’ किंमतीत खरेदी करा Apple Watch आणि Airpods, पाहा डिटेल्स

iphone 14 launch

iPhone च्या डिझाइनमध्ये गेल्या काही वर्षापासून कोणताही बदल झालेला नाही. iPhone X आल्यानंतर डिझाइन तिच ठेवण्यात आली आहे. iPhone 14 मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

iphone 14 pro max

iPhone 14 Pro च्या लाँचिंग नंतर तात्काळ या फोटोला अनेकांनी पसंत केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा केले आहे. या फोनमध्ये एका व्यक्तीकडे दोन शर्ट सारखेच दिसत आहेत. तेच आयफोनचे झाले आहे. आधीचा आणि आत्ताचा आयफोन सारखाच दिसत आहे, असे यातून सांगायचे आहे.

iphone 14 pro

आयफोन १४ च्या किंमतीचा खुलासा करण्यात आला. फोनची किंमत ८० हजार रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर हे मिम खूप व्हायरल झाले आहे.

iphone 14

अनेकांना अपेक्षा होती की, यावेळी तरी आयफोन मध्ये काही तरी बदल होईल. परंतु, व्हॅनिला मॉडल एकदम आयफोन १३ सारखेच आहे.

iphone

आयफोन लाँच होताच किडनी जोक्सचा महापूर येतो. यावेळीही नव्या अंदाजात हा जोक्स फिरत होता.

वाचाः iPhone 14 ची लाँचिंग होताच कंपनीकडून ‘या’ आयफोनची विक्री बंद, अनेकांना बसणार झटका

वाचाः मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है! एक देश, एक चार्जरवर काम झाले सुरू, पाहा फायदे

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here