नवी दिल्लीः भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यानंतर चीन उत्पादनांवर भारतात बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी () धमाकेदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. एका ताज्या रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनी तीन वेगवेगळ्या रेंजमधील स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, मायक्रोमॅक्सच्या या तीन फोनपैकी एक फोन बजेट स्मार्टफोन असणार आहे. जो प्रीमियम फीचर्स आणि मॉडर्न लूकसोबत येईल.

वाचाः

मायक्रोमॅक्सने सद्या अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, एका सोशल मीडिया पोस्टवरून हे संकेत दिले आहे. कंपनीने आपला अखेरचा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केला होता. हा मायक्रोमॅक्स iOne Note स्मार्टफोन होता. याची किंमत ८ हजार १९९ रुपये होती. नुकतीच एका युजरने ट्विट करुन मायक्रोमॅक्सला विचारले होते की, तुम्ही कधी पुनरागमन करीत आहात?, याला उत्तर देताना कंपनीने म्हटले की, तयारीत आहोत. आम्ही लवकरच काही तरी मोठे घेऊन येत आहोत.

वाचाः

फोनची किंमत किती
गॅझेट ३६० च्या एका रिपोर्टनुसार, मायक्रोमॅक्सचे हे तीन नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यांपर्यंत येऊ शकतात. कंपनीचे हे फोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील असणार आहे. तसेच कंपनी प्रीमियम फीचर्सचे एक नवीन स्मार्टफोनवर सुद्धा काम करीत आहे. कंपनीने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हा फोन बजेट फ्रेंडली आणि मॉडर्न लूक असणार आहे.

आधी मायक्रोमॅक्स नंबर वन कंपनी होती
मायक्रोमॅक्स कंपनी कधी काळी नंबर वन स्मार्टफोन कंपनी होती. २०१४ च्या तिसऱ्या तिमाहित कंपनी जगातील दहावी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी होती. चीनची कंपनी शाओमीच्या आगमनानंतर मायक्रोमॅक्स मागे पडली.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here