नवी दिल्लीः रिलायन्स आपल्या युजर्संसाठी लागोपाठ नवीन-नवीन रिचार्ज प्लान आणत आहे. कंपनीने गेल्या दोन दिवसात २ नवीन प्लान लाँच केले आहेत. जर दिवसभरासाठी तुम्हाला डेटाची गरज भासत असेल तर आम्ही तुम्हाला जिओच्या प्लानविषयी सांगत आहोत. ज्यात दररोज मिळतोय. डेटा शिवाय, या प्लानमध्ये जिओ ते जिओ फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी नॉन जिओ मिनिट मिळतात. रिलायन्स जिओकडे दरदिवशी ३ जीबी डेटा देणारे सध्या ३ रिचार्ज प्लान आहेत.

वाचाः

३४९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच यात एकूण ८४ जीबी डेटा युजर्संना मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लानमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. युजर्संना या प्लानमध्ये दररोज १०० एसएसएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळतात. जर दिवशी हिशोब केला तर तुम्हाला दररोज १२.४६ रुपये खर्च येतो.

वाचाः

४०१ रुपयांचा प्लान
जिओचा ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. रोज ३ जीबी डेटा शिवाय या प्लानमध्ये ६ जीबी डेटा आणखी मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा युजर्संना मिळतो. प्लानमध्ये युजर्संना ३९९ रुपये किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओ ते जिओ कॉलिंग प्लानमध्ये फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लानमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळतात. जर दररोज या हिशोबाप्रमाणे या डेलीचा खर्च पाहिल्यास तुम्हाला रोजच्या साठी १४.३२ रुपये खर्च करावे लागतील.

वाचाः

९९९ रुपयांचा प्लान
जिओचा ९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळते. देशभरात अन्य कोणत्याही नेटवर्कवर नंबर कॉलसाठी या प्लानमध्ये ३ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. रोज ३ जीबीसाठी तुम्हाला दिवसाचा खर्च ११.३८ रुपये आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here