नवी दिल्लीः , आणि विवो यासारख्या चीनी फोन कंपन्यांची एन्ट्रीनंतर गेल्या काही वर्षात मागे पडलेल्या भारतीय फोन कंपन्या आता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. होम बेस्ड हँडसेट निर्माता मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन देशातील चीन विरोधी उद्रेकाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे चिनी स्मार्टफोन ब्रँड्स सुद्धा भारतातील आपली जाहिरात आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलू शकते.

वाचाः

येताहेत १० हजारांपेक्षा स्वस्तातील फोन
सध्या फीचर सेगमेंटमध्ये काम करीत असलेली मोबाइल स्मार्टफोन बाजाराता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ।ETTelecom च्या एका रिपोर्टनुसार, कार्बन मोबाइलचे कार्यकारी संचालक शशीन देवसरे यांनी सांगितले की, कंपनी १० हजार रुपयांच्या सेगमेंटमधील स्मार्टफोन घेऊन येवू शकते. याआधी मायक्रोमॅक्सने सुद्धा मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर बजेट स्मार्टफोन घेऊन येण्याची घोषणा केली आहे. कार्बनने भारतात आधी ८ लाख ते १० लाख फीचर फोन विकले आहे.

वाचाः

लावा सुद्धा तयारीत
फीचर फोन आणि स्मार्टफोन दोन्ही सेगमेंटमध्ये काम करीत आहे. लावा मोबाइल सुद्धा नवीन दोन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लावा इंटरनॅशनलचे सीएमडी हरी ओम राय यांनी सांगितले की, भारतात मोबाइल फोन मॅन्यूकॅक्चरिंग आणि डिझाईन मध्ये नंबर १ देश बनण्याची तयारी करीत आहे. आम्ही विश्व स्तरांवर विजय मिळवणे हे भारताचा गौरव वाढवण्यासाठी स्वतःला तयार करीत आहे. हे एक मॅराथन आहे. स्पिंट नाही. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, लावा जुलै मध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. यात एक स्मार्टफोन Z66 असणार आहे. यात 1.20GHz ऑक्टाकोर प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० सोबत येईल.

वाचाः

काउंटर पॉइंट रिसर्च नुसार, जानेवारी ते मार्च पर्यंत ८१ टक्के स्मार्टफोनच्या शीपमेंटमध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांची आहे. तर मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय ब्रँड्सच्या कंपन्यांची भागीदारी केवळ १ टक्के आहे. काउंटर पॉइंट रिसर्चचे असोशियट डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितले, जर स्थानिक कंपन्या #vocalforlocal पिचला पकडत असेल तर त्या कंपन्या जोरदार पुनरागमन करू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here