वाचाः
काय आहे ऑफर ?
नोकिया ७.२ चा ६ जीबी रॅमचा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी केस, जॅकेट, आणि नोकियाचा सी१ फोन फ्रीमध्ये देत आहे. ही ऑफर फिलिपिन्स ग्राहकांसाठी आहे. फिलिपिन्स मध्ये हा फोन १५,९९० पीएचपी म्हणजेच २८५ यूरो आहे.
एका फोनसोबत दुसरा फोन फ्री
नोकिया ७.२ सोबत कंपनी नोकिया सी१ फोन फ्रीमध्ये देत आहे. नोकिया C1 (Nokia C1) स्मार्टफोन अँड्रॉयड ९ पाय गो एडिशनवर चालतो. नोकिया सी१ फोनमध्ये ५.४५ इंचाचा FWVGA IPS डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दोन्ही कॅमेऱ्यासोबत फ्लॅश दिला आहे. फोनमध्ये 1.3GHz क्वाड कोर प्रोसेसर सोबत १ जीबी रॅम दिला आहे. फोनमध्ये १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये 2,500 mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
नोकिया ७.२ चे खास फीचर्स
नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम दिली आहे. स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच फोनमध्ये बॅकला ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये 3,500 mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times