नवी दिल्लीः रियलमीचा बजेट स्मार्टफोन नार्जो 10A (Narzo 10A)चा नवीन व्हेरियंट आला आहे. हा चे 4GB रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा व्हेरियंट आहे. नार्जो १० ए चा नवीन व्हेरियंट २३ जून पासून उपलब्ध आहे. नार्जो १० ए चा नवीन व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन २३ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5,000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. नार्जो १० ए चा नवीन व्हेरियंट तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, बिहार आणि महाराष्ट्रा या राज्यात ऑफलाइन स्टोर्स मध्ये मिळणार आहे.

वाचाः

स्मार्टफोन्सवर मिळतेय ऑफर
स्मार्टफोनवर realme.com मध्ये ५०० रुपयांपर्यंत MobiKwik कॅशबॅक मिळत आहे. जर फ्लिपकार्टवर मिळणारी ऑफर पाहिली तर RuPay डेबिट कार्ड चा वापर केल्यानंतर आधी प्रीपेड ट्रान्झॅक्शन वर ३० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळत आहे. तर अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर ५ टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच ३ ते १२ महिन्या पर्यंत नो कॉस्ट ईएमआय प्लान्स मिळत आहेत. रियलमी नार्जो १०ए स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला होता.

वाचाः

फोनचे वैशिष्ट्ये
Realme स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ३ देण्यात आला आहे. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक Helio G70 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. नार्जो १० ए मध्ये ६४ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवता येऊ शकते.

फोनच्या बॅकला ट्रिपल कॅमेरा सेटअप
फोनच्या बॅकमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. व्हिडिओ कॉल करण्यासाठी आणि सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे. जी रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here