Best Smartphone Deals India: जबरदस्त फीचर्ससह येणारा स्मार्टफोन अनेकदा महाग असल्याने बरेच युजर्स हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकत नाही. तुम्हीही याच युजर्सपैकी एक असाल आणि जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि किंमती कमी होण्याची वाट पाहत असाल, तर, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. Flipkart Big Billion Days Sale येत्या काही दिवसांत Flipkart या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला बंपर सवलतीत टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली जाईल. Apple पासून Motorola आणि OPPO पर्यंत, सर्व ब्रँडची उपकरणे कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे या लिस्टमधील स्मार्टफोन्स खूप लोकप्रिय आहेत आणि युजर्सना आवडतील असे एकापेक्षा एक फीचर्स ऑफर करतात. चला जाणून घेऊया सेलच्या काही उत्तम ऑफर्सबद्दल.

​iPhone 13

iphone-13

iPhone 13: iPhone 14 लाँच झाल्यानंतरही, तुम्हाला iPhone 13 खरेदी करायचा असेल , तर हा Apple स्मार्टफोन Flipkart Big Billion Days सेलमधून विकत घेणे हा एक उत्तम संधी पर्याय असेल. किती डिस्काउंटवर त्याची विक्री केली जाईल याचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, ऑफर जबरदस्त असेल, असे निश्चितपणे सांगितले जात आहे. आयफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला असून यात A15 बायोनिक चिपसेट दिला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देखील देण्यात आहे.

वाचा: Blaupunkt 4K QLED TV सह आता घर बनेल थिएटर, कंपनीने लाँच केले ३ जबरदस्त मॉडेल्स,पाहा किंमत

​Oppo Reno 8 5G

oppo-reno-8-5g

Oppo Reno 8 5G: अप्रतिम फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन असलेला हा 5G स्मार्टफोन देखील फ्लिपकार्ट सेल दरम्यान स्वस्तात घेता येईल. या फोनची किंमत २६,९९९ रुपये असेल असे सांगण्यात येत आहे आणि त्यासोबत अनेक बँक ऑफर्सचा फायदा घेण्याचा पर्याय देखील दिला जाईल.फोनमध्ये Mediatek Dimensity 1300 Processor असून सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर, फ्रंट कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले असून ४५०० mAh ची बॅटरी आहे.

वाचा : घर बसल्या ‘असे’ बनवा संपूर्ण कुटुंबाचे Digital Health Card, फॉलो करा सोपी स्टेप्स

Google Pixel 6A

google-pixel-6a

Google Pixel 6a: अलीकडेच Google चा नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे, Google Pixel 6a देखील मोठ्या सवलतीत सेलमध्ये विकला जाईल. ४३,९९९ रुपयांच्या किमतीत लाँच झालेला केलेला हा फोन सर्व ऑफर्सनंतर २७,६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये कंपनी नाउ प्लेइंग सोबत ऑल्वेज ऑन डिस्प्ले फीचर सुद्धा देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून १२.२ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे.

Moto G52

moto-g52

Moto G 52: मोटोरोलाचा हा उत्तम स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमधून स्वस्तातही खरेदी केला जाऊ शकतो. सेल दरम्यान, हा स्मार्टफोन एमआरपीवर नाही तर केवळ १२,५९९ रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध केला जाईल. फोनचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यामध्ये ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले आहे. तसेच, अड्रीनो ६१० GPU सह स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटचा सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

वाचा : WhatsApp Features: मित्र-मैत्रिणींना ऑनलाइन न दिसता बिनधास्त करा चॅट, व्हॉट्सॲपचे हे फीचर आहे भन्नाट

​Redmi Note 10 Pro Max

redmi-note-10-pro-max

Redmi Note 10 Pro Max: Redmi चा हा जबरदस्त स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. हा १०८ MP रियर कॅमेरा 5G स्मार्टफोन Flipkart सेल दरम्यान फक्त १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल . या फोनमध्ये ५०२० mAh बॅटरी, AMOLED डिस्प्ले सारखे अनेक मस्त फीचर्स दिले जात आहेत. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच फुल एचडी + डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन १०८० x २४०० पिक्सल आहे. 10 Pro Max डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो.

वाचा: Smartphone Price Cut: ३,५०० रुपयांनी स्वस्त झाला सॅमसंगचा ‘हा’ मिड रेंज फोन, पाहा नवीन किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here