नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. ५४ हजार ९९९ रुपयांची किंमत असलेला हा फोन तुम्ही आज दुपारी १२ वाजता खरेदी करू शकता. फोनचा सेल अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लस इंडियाच्या वेबसाईटवर सुरू होत आहे. चार रियर कॅमेरा आणि वॉर्प चार्ज ३० टी यासारखे फीचर या फोनमध्ये आहेत.

वाचाः

किंमत आणि खास ऑफर
वनप्लस ८ प्रो ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये येतो. ८ जीबी रॅम फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. आज या सेलमध्ये या फोनवर एसबीआय कार्ड खरेदी करण्यावर ३ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. या सूटनंतर फोनला ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. तसेच फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येऊ शकते.

वाचाः

वनप्लस ८ प्रो चे वैशिष्ट्ये
120Hz चे रिफ्रेश रेट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. १२ जीबी पर्यंतच्या LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी पर्यंतच्या UFS 3.0 ऑनबोर्ड स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात दोन ४८ मेगापिक्सलचे कॅमेरे आणि ८ मेगापिक्सलचा आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फी साठी फोनमध्ये Sony IMX471 सेन्सरचा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,510mAh बॅटरी दिली आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वॉर्प चार्ज 30T आणि वॉर्प चार्ज ३० वायरलेस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. फोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. यूएसबी टाईप सी पोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here