नवी दिल्लीः भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला लोगो आणि साईन बोर्ड्सला ” लोगोने कव्हर करणे सुरू केले आहे. शाओमीने आपल्या एक्सक्लूसिव्ह आणि मल्टी बँड सेलफोन स्टोर्सच्या बाहेर अधिकृत लोगोला अशा पोस्टर्सने लपवले जात आहे. तसेच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही शाओमीच्या लोगोचा गणवेश घालू नका, असे सांगितले आहे.

वाचाः

कंपनीला देशात आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चीन विरुद्ध मोहीमेचा फटका बसू लागला आहे. दुकान आणि स्टोर्सला काही जण नुकसान पोहोचू शकतात, असा अंदाज आहे. कंपनीने लोगोला ब्रँडिंगने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्री संबंधित लोकांनी ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन (AIMRA) कडून चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सला एक लेटर लिहून म्हटले की, त्यांची दुकाने आणि उत्पादनाला मिळणाऱ्या धमकीमुळे त्यांना ब्रँडिंग लपवावे लागत आहे.

या शहरात लपवले बोर्ड
ब्रँडच्या साईन बोर्ड्स रिटेलरच्या इन्सेटिव्ह असल्याने नुकसान पोहोचू शकते. शाओमीकडून दिल्ली, एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे, आग्रा आणि पटणा या सारख्या शहरात रिटेल साईन झाकून ठेवले आहेत. तसेच कंपनीने त्या शहरात सुद्धा असे केले आहे. ज्या दुकाने आणि स्टोर्सला नुकसान पोहोचू अशा धमक्या मिळत आहेत. काऊंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, भारतात ८१ टक्के स्मार्टफोन्सवर चायनीज ब्रँड्सची भागीदारी आहे.

वाचाः

बाकी कंपन्यांनाही पत्र
AIMRA कडून शाओमी शिवाय, ओप्पो, विवो, रियलमी, वनप्लस, लेनिओ-मोटोरोला आणि हुवेई यांना पत्र लिहिले आहे. कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांची ब्रँडिंगचे साईनबोर्ड हटवण्याचे किंवा लपून ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. या पत्रात म्हटले की, अशा बोर्ड्सला नुकसान पोहोचवल्यास रिटेलर जबाबदारी घेणार नाही. कारण, या सध्याची परिस्थिती नियंत्रणात नाही. चीन विरोधी मोहीम संपेपर्यंत असे करण्यास कंपन्यांना परवानगी मागितली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here