नवी दिल्लीः शाओमी नवीन-नवीन स्मार्टफोन आणि प्रोडक्ट आणून नेहमी चर्चेत असते. आता शाओमी ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ ली जुन यांनी आपले ३ आवडते स्मार्टफोन शेअर केले आहेत. ली जुन यांचा सर्वात जास्त आवडता फोन असल्याचे म्हटले आहे. या फोनमध्ये सेरामिक बॉडी देण्यात आली आहे. जुन यांच्या माहितीनुसार, ही यूनीबॉडी सेरामिक डिझाईन सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. याला बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात तसेच याला खर्चही खूप येतो, असे जुन यांनी म्हटले आहे.

वाचाः

Mi Mix 2 सर्वात जास्त आवडता फोन
Mi Mix 2 स्मार्टफोन बनवण्याची प्रोसेस जुन यांना खूप आवडते. त्यामुळे हा फोन त्यांचा आवडता फोन आहे. युनिबॉडी सेरामिकचे प्रत्येक तुकड्याला ७ दिवसांसाठी १४०० डिग्री सेल्सियसवर ठेवले जाते. तसेच स्मार्टफोन बनवण्यासाठी अन्य काही दुसरी प्रोसेस सुद्धा असतात. जुन यांच्या यादीत दुसरा फोन आहे. शाओमीचे ग्रुपचे सीईओ यांनी म्हटले की, या फोनमध्ये व्हॅक्यूम – प्लेटेड ग्लास बॅक शेल देण्यात आला आहे. याचा वापर काचप्रमाणे केला जाऊ शकतो. ब्राइट स्टेनलेस स्टील फ्रेम या फोनमध्ये या फोनला खूप चांगला लूक येतो.

वाचाः

मध्ये जबरदस्त एक्सपिरियन्स देण्यावर फोकस
शाओमी ग्रुपचे ली जुन यांनी Mi 10 Pro या स्मार्टफोनला आपला तिसरा आवडता फोन असल्याचे म्हटले आहे. हा फोन जगभरात उपलब्ध होणाऱ्या कंपनीचा पहिला फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. जुन यांच्या म्हणण्यानुसार, Mi 10 Pro स्मार्टफोन मध्ये कंपनीने किंमत कमी करण्यावर फोकस केला नाही. उलट, हाय-इंड स्मार्टफोन चाहत्यांना जबरदस्त एक्सपिरियन्स मिळावा यासाठी फोकस केला आहे. शाओमी, स्मार्टफोन्स शिवाय, अनेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स घेऊन येत आहे. याला जगातील वेगवेगळ्या मार्केटमध्ये लाँच करण्यात येत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here