Smartphone Blasts : नुकतीच बरेली शहरात एका फोनमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये फोन चार्जिंगवर होता. महत्वाचे म्हणजे या दुर्दैवी घटनेत आठ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मुलीला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. तर, दुसरीकडे काही दिवसांपुर्वीच एका नामंकित कंपनीच्या फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. याशिवाय या वर्षी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीच्या फोनला आग लागली. फोनमध्ये ब्लस्ट होऊन नुकसान झाल्याची अनेक प्रकरणे आता[पर्यन्त समोर आली आहेत. काही वेळा स्मार्टफोनमध्ये बिघाड असतो. तर, कधी युजर्सच्या फोन वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील ब्लास्ट होतात. अशा प्रकारची घटना तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबियांसोबत सोबत घडू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जाणून घ्या फोन वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायची.

Processor Overload

processor-overload

जर तुमचा फोन खराब झाला असेल तर कोणत्याही स्थानिक दुकानातून फोन दुरुस्त करून घेऊ नका. Service Centre वर जाऊनच फोन दुरुस्त करा. तुमच्याकडे योग्य माहिती नसल्यास, स्थानिक दुकानात सर्किटमध्ये गोंधळ होऊ शकतो.

Overload: फोनचा चिपसेट ओव्हरलोड करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेमिंग आणि मल्टी-टास्किंग करताना फोन पटकन गरम होतो. याचे कारण फोनचा प्रोसेसर आहे. जेव्हा प्रोसेसर लोड घेऊ शकत नाही, तेव्हा ते गरम होऊ लागते. जर तुम्हाला वाटत असेल की फोन खूप गरम होत आहे, तर काही मिनिटांसाठी तुमचा स्मार्टफोन बंद करा.

वाचा :SAR Value: आरोग्यासाठी किती घातक आहे तुमचा मोबाईल, ‘या’ कोडच्या मदतीने करा माहित, पाहा स्टेप्स

Continue Usage

continue-usage

जर तुम्ही फोन सतत वापरत असाल तर तुम्ही फोन जास्त वेळ वापरत नाही याची काळजी घ्या. यामुळे फोनची बॅटरी दीर्घकाळ खराब होऊ शकते. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात किंवा बंद कारमध्ये दीर्घकाळ राहिल्यास स्मार्टफोन गरम होऊ शकतो. चार्जिंग करताना तुमचा फोन जास्त गरम होणार नाही याची खात्री करा

एक्स्टेंशन कॉर्डमध्ये प्लग करून चार्ज करू नका: तुमचा फोन पॉवर स्ट्रिप किंवा एक्स्टेंशन कॉर्डमध्ये प्लग करून चार्ज करू नका. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो.

वाचा: कलर चेंजिंग बॅक पॅनेलसह TECNO CAMON 19 Pro Mondrian लाँच, डिझाईन पाहून प्रेमात पडाल

Removable Battery

removable-battery

जर तुम्ही फोन चार्ज करण्यासाठी कार चार्जिंग अॅडॉप्टर वापरत असाल तर ते तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारमध्ये चार्जिंगसाठी, तुम्ही फक्त पॉवर बँक वापरा. कारण, बहुतेक कार मालक त्यांच्या कारमध्ये थर्ड पार्टी विक्रेत्यांकडून अॅक्सेसरीज बसवतात. त्यांच्या वायरिंगचा दर्जा माहीत नसतो. अशा स्थितीत अचानक विजेचा प्रवाह गेल्याने तो खराब होऊन फोनचा स्फोट होऊ शकतो.

Removable Battery: तुमच्या फोनमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरी असल्यास बनावट बॅटरी कधीही वापरू नका. असे केल्याने फोनचा कधीही स्फोट होऊ शकतो. तसेच खराब बॅटरी वापरू नका. फोनमधील खराब लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम होतात. यामुळे फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

वाचा: ‘या’ प्रोजेक्टची देशभरात चर्चा ; Semiconductor Chip म्हणजे काय?, भारत महासत्ता बनणार?

Duplicate Charger

duplicate-charger

चुकूनही तुमच्या फोनसोबत बनावट किंवा डुप्लिकेट चार्जर वापरू नका. नेहमी मूळ चार्जर वापरा. स्वस्त किंवा डुप्लिकेट चार्जर खरेदी करून कधीही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर ताण येतो. एवढेच नाही तर तुम्हाला कोणाचेही अडॅप्टर आणि कोणाची केबल वापरण्याची गरज नाही. जो फोन आहे तो चार्जर वापरावा लागेल आणि त्याचे अॅडॉप्टर वापरावे लागेल.

खराब केबल : केबल वापरतानाही चुकूनही खराब केबलचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

Battery / Damaged Phone

battery-/-damaged-phone

जर फोनची बॅटरी स्वेल झाली असेल तर, हा सर्वात मोठा इशारा आहे. असे झाले असेल तर लगेच फोन सर्व्हिस सेंटरमध्ये न्या. या प्रकारच्या बॅटरीचा कधीही स्फोट होऊ शकतो.

सतत खराब फोन वापरणे : ही आपल्या सर्वांच्या सवयीमध्ये समाविष्ट आहे. कुठून तरी खराब झालेला किंवा तुटलेला फोन कधीही वापरू नका. जर फोनचा डिस्प्ले तुटला असेल तर यंत्र किंवा बॅटरीमध्ये पाणी किंवा घाम जात राहतो. यामुळे फोनचे Internal Elements खराब होऊ शकतात. यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.

वाचा: हा प्लान आहे Jio युजर्सचा फेव्हरेट, प्लानमध्ये Disney+ Hotstar सह बरंच काही, किंमत नाही जास्त

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here