Smartphone Offers: फ्लिपकार्ट फेस्टिवल सेल जस- जसा जवळ येत आहे. तस- तशी स्मार्टफोन डीलबाबत ग्राहकांची उत्सुकता देखील वाढत आहे. २३ सप्टेंबरपासून ग्राहक Big Billion डेज सेल ऑफरचा लाभ घेऊ शकतील. या दरम्यान, आश्चर्यकारक ऑफर देण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही बेस्ट संधी आहे. जी, तुम्ही गमावली तर, तुम्हाला नक्कीच याचा पश्चाताप होईल. आज आम्ही तुम्हाला या सेलच्या टॉप १० स्मार्टफोन डील एकत्र करून त्याबद्दल विस्तृत माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑफर शकाल. फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड आणि HDFC बँक कार्ड्ससह अतिरिक्त कॅशबॅक देखील देत आहे.
समोर आलेल्या किमतींमध्ये बँक ऑफरसह उपलब्‍ध सवलतींचाही समावेश आहे. म्हणजेच, बँकेच्या ऑफर लागू होत नसल्यास, तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.

Redmi 10

redmi-10

Redmi 10: जर तुम्हाला बजेट सेगमेंटमधून नवीन फोन निवडायचा असेल आणि फीचर्समध्ये तडजोड करायची नसेल, तर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi 10 खरेदी करू शकाल. सध्या Redmi 10 ची सूचीबद्ध किंमत १०,९९९ रुपये आहे.

Moto G32: जर तुम्हाला १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन हवा असेल, तर Flipkart Big Billion Days सेल दरम्यान तुम्ही Moto G32 ९,८९९ रुपयांना खरेदी करू शकता. सध्या Moto G32: ची किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरू होते.

वाचा : WhatsApp मध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह न करता देखील होणार चॅटिंग, पाहा ही सोप्पी ट्रिक

Moto G62

moto-g62

Moto G62: जर तुम्हाला मजबूत कॅमेरा असलेला Moto G62 घ्यायचा असेल, तर तुम्हाला हा फोन १७,९९९ रुपयांऐवजी १४,४९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल. ही सवलत बँक ऑफर्ससह उपलब्ध असेल.

Poco F4 : Poco चा मिड-रेंज 5G फोन Poco F4 Big Billion Days सेल दरम्यान २१,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, तर या डिव्हाइसची सूचीबद्ध किंमत सध्या २७,९९९ रुपये आहे. म्हणजेच Poco F4 वर सुमारे ६,००० रुपयांची सूट दिली जात आहे.

वाचा:Air Charger: चार्जरची नाही गरज, हवेतच चार्ज होणार स्मार्टफोन, ‘ही’ टेक्नोलॉजी आहे भन्नाट

​Google Pixel 6a

google-pixel-6a

Google Pixel 6a: Google Pixel 6a वर देखील मोठी सूट मिळत आहे आणि ४३,९९९ रुपयांऐवजी Google Pixel 6a ची सुरुवातीची किंमत २७,६९९ रुपयांपर्यंत पोहोचू शकते. महत्वाचे म्हणजे या किंमतीमध्ये सर्व बँक कार्ड, प्रीपेड ऑर्डर आणि विशेष सवलत समाविष्ट आहेत.

Realme 9 Pro+ : जर तुम्हाला मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही २२,९९९ रुपये किंमतीचा Realme 9 Pro + १७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. डिव्हाइसची ही किंमत आधीच वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे.

वाचा : वाढताहेत Smartphone Blast च्या घटना, फोन वापरताना घ्या काळजी, आजच बदला ‘या’ १० सवयी

Nothing Phone (1)

nothing-phone-1

Nothing Phone (1): Flipkart Big Billion Days सेलमध्ये नथिंग फोन (1) २८,९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध असेल. सध्या त्याची किंमत ३३,९९९ रुपये आहे. म्हणजेच, वेगवेगळ्या ऑफर्ससह, नथिंग फोन (1) वर ५,००० रुपयांची सूट मिळेल.

iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max : बिग बिलियन डेज सेलमध्ये, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ९०,००० रुपये आणि १,००,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. ग्राहकांना अनेक ऑफर्सचा लाभ मिळेल.

iPhone 13

iphone-13

iPhone 13: सेलमध्ये सर्वाधिक मागणी गेल्या वर्षी लाँच झालेल्या Apple iPhone 13 मध्ये दिसू शकते. जो ६९,९९० रुपयांऐवजी ४९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. म्हणजेच या फोनवर बँक ऑफर आणि इतर अटींसह २०,००० रुपयांची सूट दिली जाईल.

iPhone 12 Mini आणि iPhone 11: Apple च्या जुन्या उपकरणांवरही विक्रीत मोठी सूट मिळणार आहे. असे समोर आले आहे की, आयफोन 12 मिनी ४०,००० रुपयांपेक्षा कमी प्रभावी किमतीत आणि आयफोन 11 ऑफसह ३०,००० रुपयांपेक्षा कमी प्रभावी किमतीत खरेदी करता येईल.

वाचा: वाढताहेत Smartphone Blast च्या घटना, फोन वापरताना घ्या काळजी, आजच बदला ‘या’ १० सवयी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here