नवी दिल्लीः शाओमी () ने मार्च महिन्यात आपला 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आणला होता. या टेक्नोलॉजीच्या वापराने 4000mAh ची पूर्ण डिस्चार्ज बॅटरी केवळ १७ मिनिटात चार्ज होईल. या टेक्नोलॉजीचा कमर्शल व्हर्जन कंपनीने लाँच नाही केला. आता आलेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच 100W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी घेऊन येत आहे. परंतु, कंपनी कोणत्या फोनमध्ये सर्वात जास्त या टेक्नोलॉजीचा वापर करणार आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वाचाः

मध्ये मिळू शकतो 100W चार्जिंग
काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी Mi Mix 4 मध्ये 100W चार्जिंगचा वापर करु शकते. परंतु, कंपनीने यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

गेमिंग स्मार्टफोनमध्ये 100W चार्जिंग
चीनच्या प्रसिद्ध टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार, क्वॉलकॉम नवीन प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८७५ घेऊन येत आहे. गेमिंग स्मार्टफोनमध्ये याचा वापर केला जावू शकतो. याशिवाय शाओमच्या १०० वॅट चार्जिंग सुद्धा गेमिंग स्मार्टफोन मध्ये दिसेल. शाओमीने म्हटले की, 100W सुपर चार्ज टर्बो टेक्नोलॉजी ९ फोल्ड चार्ज प्रोटेक्शन आणि हाय व्होल्टेज चार्ज पंप सोबत येतो. कंपनीच्या माहितीनुसार, ९ फोल्ड प्रोटेक्शनपैकी ७ मदरबोर्ड साठी आहेत. तर २ फोल्ड प्रोटेक्शन बॅटरी साठी आहेत.

वाचाः

विवो घेऊन येतोय 120W सुपरफास्ट चार्जिंग
सुपरफास्ट चार्जिंग मध्ये शाओमीला जोरदार टक्कर मिळू शकतो. विवो सुद्धा नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करीत आहे. शाओमी पेक्षा दोन पावलं पुढे विवो 120W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी तयारी करीत आहे. विवोने गेल्या वर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस मध्ये सुपर फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी आणली होती. विवोच्या या टेक्नोलॉजीने केवळ १३ मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here